Pune FDA Action: पुणे विभागातील तीन हॉटेलचे परवाने निलंबित; कोरेगाव पार्क येथील सैराट बिर्याणीचा समावेश

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने पुणे विभागातील मलकापूरचे हॉटेल शाही, लोणावळ्याचे साबेर रेस्टॉरंट आणि कोरेगाव पार्कमधील सैराट बिर्याणीचे परवाने एफडीएने निलंबित केले.
Hotel License Suspended
Hotel License SuspendedPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुरुवारी पुणे विभागांतर्गत तीन हॉटेलचे परवाने तत्काळ निलंबित केले. मलकापूर (सातारा) येथील हॉटेल शाही, लोणावळ्यातील साबेर रेस्टॉरंट आणि पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सैराट बिर्याणी या तीन हॉटेलचा समावेश आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या १० सप्टेंबर रोजीच्या पत्रकानुसार, संबंधित आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भातील निर्धारित नियमांचे उल्लंघन आढळून आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत अन्न व्यवसायिकांना स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि निर्धारित अटींचे पालन केले नसल्याचे पालन केले नसल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले.

Hotel License Suspended
Pune Airport Renovation: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही अन्न औषध विभागाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news