Pune Airport Renovation: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे नूतनीकरण करून विस्तारित चेक-इन आणि सिक्युरिटी होल्ड एरिया तयार करण्यात आला आहे. BCASच्या अंतिम परवानगीनंतर हे क्षेत्र लवकरच सेवेत येणार आहे.
Pune Airport Renovation
Pune Airport RenovationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करून उभारण्यात आलेल्या विस्तारित चेक-इन आणि सिक्युरिटी होल्ड एरियाची केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली.

प्रवाशांची वाढती संख्या, पीक अवर्समधील गर्दी आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या जुन्या टर्मिनलचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

आता फक्त ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीची अंतिम परवानगी बाकी असून, ती मिळाल्यानंतर हे नवे विस्तारित टर्मिनल क्षेत्र लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देतानाच पीक अवर्समधील गर्दी कमी करणे, ही आमची प्राथमिकता आहे.

Pune Airport Renovation
Health Department | आता आरोग्य अधिकाऱ्यांनाही ‘ओपीडी बंधनकारक’

जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करून त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आता अंतिम परवानगी लवकरच मिळणार असून, तशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच जुने टर्मिनल नव्या आणि अत्याधुनिक स्वरूपात पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.

असे आहे नूतनीकरण केलेले जुने टर्मिनल..

नूतनीकरण करण्यात आलेल्या या सुविधेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 4,075 चौरस मीटर असून, त्यामध्ये चेक-इन, प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक आणि सिक्युरिटी होल्ड एरिया यांचा समावेश आहे. विस्तारित चेक-इन क्षेत्रात 14-सक्षम चेक-इन काऊंटर उभारण्यात आले आहेत.

Pune Airport Renovation
Ganeshotsav 2026 : यंदा गणेशोत्सव १२ दिवसांचा; हरितालिका-गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

तसेच चेक-इन क्षेत्रात 2 एक्सबीआयएस मशिन्स आणि 1 रँडम एक्सबीआयएस मशिन, तर पीईएससी क्षेत्रात 4 एक्सबीआयएस मशिन्स आणि 8 डीएफएमडीएस मशिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बोर्डिंगसाठी 6ए आणि 6बी अशी दोन बोर्डिंग गेट्स तयार करण्यात आली आहेत.

जुन्या टर्मिनलमुळे प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे 405 प्रवासी प्रतितासाने वाढणार

रिटेल आऊटलेट्ससाठी एकूण 66.40 चौरस मीटर, तर फूड अँड बेव्हरेज आऊटलेट्ससाठी 70.13 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या पालकांसाठी डायपर चेंजिंग स्टेशन, वॉशरूम तसेच गरम आणि थंड पाण्याची सुविधा असलेली स्वतंत्र बेबी केअर रूम तयार करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी पॉवर सॉकेट्सची सुविधा असलेल्या तीन आसनी खुर्च्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या या सुविधेमुळे पुणे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता सुमारे 405 प्रवासी प्रति तासाने वाढणार आहे. त्यामुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवाशांची हालचाल अधिक सुरळीत होऊन चेक-इन आणि सिक्युरिटी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news