Unlicensed Cosmetics Seized: पुण्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांचा ७.३० लाखांचा साठा जप्त; एफडीएची कारवाई

कोंढव्यातील मायरा कॉस्मेटिक्सवर छापा; लेबलिंग नियमांचे उल्लंघन, चार उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार
Unlicensed Cosmetics Seized
Unlicensed Cosmetics SeizedPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कोंढवा खुर्द येथील एका सौंदर्य प्रसाधन विक्री करणाऱ्या दुकानात विनापरवाना तसेच लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन करून विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ७ लाख ३० हजार २६२ रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी जप्त केला.

Unlicensed Cosmetics Seized
Pune Bike Taxi Protest: बाईक टॅक्सीविरोधात पुण्यात रिक्षाचालकांचा बंद; रॅपिडोवर आजपासून कारवाईचे आश्वासन

या कारवाईमुळे सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारातील नियमबाह्य विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाने ही कारवाई केली. औषध निरीक्षक श्रुतिका के. जाधव (राठोड) यांनी २३ नोव्हेंबर रोजी मीठानगर, कोंढवा खुर्द येथील ‘मायरा कॉस्मेटिक्स’ या दुकानाची तपासणी केली.

Unlicensed Cosmetics Seized
Pune Market Yard Workers Protest: मार्केट यार्डात ५० किलो वजनमर्यादेचा पेच; ५ डिसेंबरपासून बेमुदत बंदचा इशारा

दुकानाचे प्रभारी मोहम्मद तौसीफ मंजूर शेख यांच्या उपस्थितीत केलेल्या तपासणीत काही उत्पादनांवर आवश्यक परवाना तपशील नव्हता तसेच उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, यांसारखी अनिवार्य माहितीही काही उत्पादनांवर नमूद नसल्याचे आढळले.

Unlicensed Cosmetics Seized
Maharashtra Drought Water Shortage: राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाणीटंचाई निवारणाला निधीत प्राधान्य

औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० मधील तरतुदींनुसार प्रशासनाने कलम २२ (१) (क) अंतर्गत हा साठा जप्त केला. कोरियन ग्लास स्कीन नाइट क्रीम, क्लिनिकल नाइट व्हाइटनिंग फॉर्म्युला, २४ के गोल्ड क्रीम आणि अँटी हेअर फॉल हर्बल हेअर ऑईल या चार उत्पादनांचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

Unlicensed Cosmetics Seized
Shalarth System Correction: शिक्षकांच्या शालार्थ नोंदीत बदलासाठी नवी कार्यपद्धती; ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक

तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, अशी माहिती पत्रकाद्वारे दिली. सौंदर्य खुलविण्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या गुणवत्तेवर आणि वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना उत्पादकाचे नाव, पत्ता, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक आणि अंतिम मुदत तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.