Maharashtra Drought Water Shortage: राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पाणीटंचाई निवारणाला निधीत प्राधान्य

उद्याने, सुशोभीकरण आणि सिमेंट रस्त्यांची कामे तात्पुरती स्थगित करण्याचे निर्देश; ३१ डिसेंबरपर्यंत निधी पुनर्विनियोजनाची मुदत
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई निवारणासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी आता पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करणे, जलस्रोत बळकट करणे आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने वापरण्यात येणार आहे.

Drought
Shalarth System Correction: शिक्षकांच्या शालार्थ नोंदीत बदलासाठी नवी कार्यपद्धती; ऑनलाइन प्रस्ताव सादर करणे बंधनकारक

त्यासाठी उद्याने, सुशोभीकरण, नवीन प्रशासकीय इमारती आणि सिमेंट रस्त्यांसारख्या पाणीटंचाई निवारणासाठी अत्यावश्यक नसलेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Drought
Ajit Pawar Plane Crash Inquiry: अजित पवार विमान अपघाताची घाई न करता पारदर्शक चौकशी करा; आशिष शेलार यांची भूमिका

नियोजन विभागाने १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, दुष्काळी तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या तसेच सध्या अत्यावश्यक नसलेल्या कामांना स्थगिती देता येणार आहे. अपूर्ण जलवाहिन्या व यंत्रणेची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.

Drought
Soil Water Conservation Works: मृद व जलसंधारणाची कामे कृषी विभागाकडे; ३० जून २०२७ पर्यंत कामांना शासनाची मंजुरी

३१ डिसेंबरपर्यंत निधीचे पुनर्विनियोजन

अनावश्यक कामांसाठी उपलब्ध निधीचे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पुनर्विनियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, सुरू असलेल्या सर्व कामांना सरसकट स्थगिती दिली जाणार नाही. कामाची सद्यस्थिती, झालेला खर्च, करारातील अटी, सार्वजनिक सुरक्षितता आणि संभाव्य आर्थिक दायित्वांचा विचार करून प्रत्येक प्रकरणात स्वतंत्र निर्णय घ्यावा लागणार आहे.

Drought
Tukaram Mundhe FDA Action: नियमभंग करणाऱ्यांचे परवाने आता थेट रद्द करणार; तुकाराम मुंढेंचा व्यावसायिकांना इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना सात दिवसांची मुदत

शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुकानिहाय पाणीसाठा, अपूर्ण पाणीपुरवठा योजना, सुरू असलेली कामे आणि अतिरिक्त निधीची गरज यांचा आढावा घ्यायचा आहे. त्यानंतर १५ दिवसांच्या आत तालुकानिहाय आणि कामनिहाय जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करणे बंधनकारक आहे. कामांची प्रगती, मंजूर निधी आणि प्रत्यक्ष खर्चाचा दरमहा आढावा घेऊन त्याची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देशही दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.