Pune Family Planning: पुण्यात कुटुंब नियोजनाचा भार महिलांवरच; ८४२२ महिलांमागे केवळ ३८९ पुरुषांची नसबंदी

पुरुष नसबंदीचे प्रमाण अत्यल्प; गैरसमज आणि सामाजिक मानसिकतेचा अडथळा, तात्पुरत्या गर्भनिरोधक साधनांचा वापर वाढला
Family Planning
Family PlanningPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: कुटुंब नियोजनाच्या पर्यायात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत तब्बल २० ते २५ पटींनी अधिक असून आठ हजार ४२२ महिलांमागे केवळ ३८९ पुरुषांनी नसबंदी केल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांतील आकडेवारी याचप्रमाणे असल्याने महानगरपालिकेकडून कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२५-२६ मध्ये ८ हजार ४२२ महिलांनी नसबंदी केली, तर पुरुष नसबंदीचा आकडा अवघा ३८९ राहिला. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार अद्याप महिलांच्या खांद्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Family Planning
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांचा स्वतंत्र पॅनेलचा निर्णय; संजय जगतापांची साथ

त्याचबरोबर महिला नसबंदीची कामगिरी गेल्या तीन वर्षांत सातत्याने घसरत असल्याचे दिसते. २०२३-२४ मध्ये १३ हजार २०० उद्दिष्टांपैकी १० हजार २२४ महिलांनी नसबंदी केली. म्हणजेच उद्दिष्टाच्या ७७.४५ टक्के कामगिरी झाली. २०२४-२५ मध्ये ८ हजार ७१८ महिलांनी नसबंदी केली असून, कामगिरी ६६.०५ टक्क्यांवर आली. २०२५-२६ मध्ये ८ हजार ४२२ महिलांनी नसबंदी केली आणि उद्दिष्टपूर्ती ६३.८० टक्क्यांवर घसरली.

Family Planning
Pune Swine Flu: पुण्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक; ९ महिन्यांत ६९१ रुग्ण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्येच ६२६ बाधित

पुरुष नसबंदीची स्थिती त्याहूनही गंभीर आहे. तीनही वर्षांत १ हजार १०० पुरुष नसबंदीचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्ष कामगिरी अनुक्रमे ३६२, ३७३ आणि ३८९ इतकीच राहिली. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती ३२.९१, ३३.९१ आणि ३५.३६ टक्के इतकीच झाली. संख्या थोडी वाढत असली तरी पुरुष नसबंदीचा सहभाग अत्यल्प असल्याचे स्पष्ट दिसून येते.

तात्पुरत्या उपायांकडे कल

कायमस्वरूपी पद्धतींच्या तुलनेत तात्पुरत्या गर्भनिरोधक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. ओरल पिल्सचे वितरण २०२३-२४ मध्ये ३० हजार ४३९ होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून ४३ हजार ३१० झाले. २०२५-२६ मध्ये ३१ हजार २ वर आले. मात्र, चालू वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट या अवघ्या पाच महिन्यांत १ लाख ३४ हजार ११७ ओरल पिल्सचे वितरण झाले आहे.

Family Planning
Baramati Crime: बारामतीत गंभीर गुन्ह्यांच्या घटनांनी चिंता वाढली; अल्पवयीनांच्या हाती घातक शस्त्रे

प्रतिवर्ष ११०० पुरुषांची नसबंदीचे उद्दिष्ट असताना गेल्या तीन वर्षांतील परिस्थिती

  • उद्दिष्ट - २०२३-२४ - २०२४-२५ - २०२५-२६

  • महिला नसबंदी : १०,२२४ - ८,७१८ - ८,४२२

  • पुरुष नसबंदी : ३६२ - ३७३ - ३८९

  • एकूण टक्केवारी - ३२.९१ टक्के - ३३.९१ टक्के - ३५.३६ टक्के

  • एप्रिल–ऑगस्ट २०२६ : महिला ३,३३२ आणि पुरुष ९६

तात्पुरत्या साधनांचा वापर वाढला असून ओरल पिल्सचा तीन वर्षातील वापर

  • २०२३-२४ - ३०,४३९

  • २०२४-२५ - ४३,३१०

  • २०२५-२६ - ३१,००२

  • एप्रिल–ऑगस्ट २०२६ - १,३४,११७

‘अंतरा’ इंजेक्शनचा वापर

  • २०२३-२४ - १,९२८

  • २०२४-२५ - १,८३४

  • २०२५-२६ - १,३०१

Family Planning
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नवा ट्विस्ट; पुरुषोत्तम जगतापांच्या मेळाव्यामुळे राजकीय हालचालींना वेग

गैरसमजांचा अडथळा

पुरुष नसबंदीबाबतचे गैरसमज, सामाजिक मानसिकता आणि पुरेशी जनजागृती न होणे, यामुळे एनएसव्हीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य यंत्रणेच्या अनुभवातून दिसते. कुटुंब नियोजनाची जबाबदारी समान पद्धतीने स्वीकारण्यासाठी पुरुषांचा सहभाग वाढविणे हे महापालिकेसमोरील महत्त्वाचे आव्हान ठरत आहे.

महानगरपालिकेकडून जागतिक लोकसंख्या दिन, तसेच विविध उपक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिर आणि जाहिरात प्रकटनाद्वारे नागरिकांना आवाहन केले जात आहे. नसबंदीबाबत महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. याबाबत नवीन पद्धतीचा अवलंब करण्याचे नियोजन सुरू आहे.

डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news