Baramati Crime: बारामतीत गंभीर गुन्ह्यांच्या घटनांनी चिंता वाढली; अल्पवयीनांच्या हाती घातक शस्त्रे

बाबुर्डीत दोन महिलांची हत्या, माळेगावात तरुणांवर सशस्त्र हल्ला; कोम्बिंग आणि शस्त्र तपासणीला वेग देण्याची गरज
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: शांत, सुरक्षित आणि विकसित अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. अल्पवयीन मुलांकडे देशी बनावटीचे कट्टे आढळणे, बाबुर्डीच्या शेरेवाडीत झालेले दोन महिलांचे खून आणि माळेगावात तरुणांवर कोयत्याने केलेला जीवघेणा हल्ला, या घटनांमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Crime News
Shirur Crime: शिरूरच्या कारेगावात पाण्याच्या प्लँटमध्ये गोळी झाडून कामगाराची हत्या

अल्पवयीन मुलांच्या हाती कट्टे व अन्य घातक शस्त्रे पोहोचत असल्याचे प्रकार बारामतीत सातत्याने घडत आहेत. देशी कट्टे सहजतेने उपलब्ध होत आहेत. गत महिन्यात देशी कट्ट्यातून गोळी झाडून घेत एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. देशी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाला अटक केली. बारामतीत सहजपणे मिळणारे देशी पिस्तुले, कोयते, तलवारी हे आता चिंतेचा विषय ठरत आहेत. विविध गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांमध्ये अल्पवयीनांचा समावेश वाढला आहे. घातक शस्त्रे त्यांच्यापर्यंत कशी पोहोचतात हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Crime News
Bhor Butterfly Species: निरा नदीकाठच्या मळा परिसरात फुलपाखरांच्या तब्बल ७१ प्रजातींची नोंद

बाबुर्डी परिसरातील दोन महिलांच्या खुनाच्या घटनांनीही नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. या गंभीर घटनांचा तपास करताना हल्ल्यामागील कारणे, आरोपींची पार्श्वभूमी आणि गुन्ह्याचे नेमके स्वरूप तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रकारही घडत आहेत. नुकतेच एका चार वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचाराचा घृणास्पद प्रकार शहरात घडला. दरम्यान, तालुक्यातील माळेगाव परिसरात तरुणांवर झालेल्या खुनी हल्ल्यामुळेही धाडस वाढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणांपासून वाद वाढत जाऊन हल्ले, मारामाऱ्या आणि त्यानंतर थेट जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत. ही बाब बारामतीसाठी निश्चितच धोकादायक बनू पाहत आहे.

Crime News
Malegaon Development Plan: माळेगावच्या विकास आराखड्यात बाह्य रस्त्यांचा मुद्दा; हजारो एकर शेती बाधित होण्याची भीती

कोम्बिंग, शस्त्र तपासणीला वेग देण्याची गरज

गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पण घटना घडल्यानंतर अशा मोहिमा हाती घेण्यापेक्षा त्या सातत्यपूर्ण राबवणे गरजेचे आहे. तसेच अल्पवयीन मुलांच्या हालचालींकडे पालक, शाळा-महाविद्यालये आणि पोलिसांनी समन्वयाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Crime News
Fursungi Uruli Devachi Municipal Council: फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील २८ नगरसेवकांवर बनावट कागदपत्रांचे आरोप; चौकशीचे आदेश

खा. सुळे यांच्याकडून गृहमंत्र्यांना पत्र

माळेगाव येथील पेट्रोल पंपावरील सशस्त्र हल्ला आणि बाबुर्डी- शेरेवाडी येथे दोन महिलांच्या हत्येची खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर दखल घेतली. दोषींवर कठोर कारवाई करत नागरिकांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे बारामती तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस प्रशासनाने या गुन्ह्यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. वाढत्या गुन्हेगारीला वेळीच आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news