Pune Fake Doctor: शहरातील दोन बोगस डॉक्‍टरांवर गुन्‍हे दाखल; पदवी-नोंदणीविना ‘गुरुकृपा क्लिनिक’

याप्रकरणी उद्धव चव्हाण यांच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत बोगस डॉक्‍टरवर वारजे माळवाडी आणि चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्‍या गुन्‍ह्यात वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पदवी आणि वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना नावापुढे ‘डॉक्टर’ पदवी लावून रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी उपचार केल्याचा प्रकार वारजे माळवाडीत उघडकीस आला.

संबंधित व्यक्ती नॅचरोपॅथीचा व्यवसाय करत असतानाही नागरिकांना अ‍ॅलोपॅथी औषधे देत असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी उद्धव चव्हाण यांच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Doctors
Ganeshotsav 2026: हरितालिका, श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी; यंदा १२ दिवसांचा गणेशोत्सव, २०१७ नंतर पुन्हा जुळून आला दुर्मीळ योग

याबाबत डॉ. गणेश अंबादास दमाळे (वय ३९, रा. संस्कृती सोसायटी, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२५ ते दि. ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सहयोगनगर, गोकुळनगर पठार येथील ‘गुरुकृपा क्लिनिक’मध्ये हा प्रकार सुरू होता. आरोपीकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक मान्यताप्राप्त पदवी नसल्याचे तसेच कोणत्याही वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वारजे माळवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या गुन्‍ह्यात वैध वैद्यकीय नोंदणी नसताना नावापुढे ‘डॉक्टर’ पदवी लावून वैद्यकीय व्यवसाय केल्याचा प्रकार खराडीत उघडकीस आला. हॉस्पिटलमध्ये बनावट मेडिकल नोंदणी प्रमाणपत्र लावल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी धीरज दिलीप येवले (वय २९, रा. चाळीसगाव, जि. जळगाव) याच्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Doctors
PMP Fake App: पीएमपीच्या फेक ॲपचा धक्कादायक प्रकार! बनावट तिकिटांवर हजारो प्रवासी फुकट फिरल्याचा संशय

याबाबत गोपाळ किशनराव उजवणकर (वय ४०, रा. अंबानगरी सोसायटी, धानोरी रस्ता, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. जुलै २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत जुना मुंढवा रस्त्यावरील प्लॅटिनियम टॉवरमधील श्री विघ्नहर्ता पॉलिक्लिनिक आणि विश्रांतवाडीतील हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. आरोपीने वैध नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार केले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news