Pune Water Supply Scheme: समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात; एप्रिलअखेर सुरू होणार

पुण्यातील रखडलेली समान पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून एप्रिलअखेर पाणीपुरवठा सुरू होण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

हडपसर: अनेक वर्षांपासून रखडलेल्या हडपसर परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिलअखेर काळेबोराटेनगर व गाडीतळ बसथांब्याजवळील योजनेच्या टाक्या व वितरणाचे काम होऊन याअंतर्गत येणाऱ्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिले आहे. यापूर्वीही वेळोवेळी अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, अद्यापी येथील योजना पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे आतातरी महापालिकेकडून हे आश्वासन पाळले जाईल का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Water Supply
Pune Vehicle Re Registration: नवीन वाहनांऐवजी जुन्यांनाच पसंती; पुण्यात 44,800 पुनर्नोंदणी

हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळनगर, पंधरा नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, काळेबोराटेनगर, ससाणेनगर, माळवाडी आदी भागांमध्ये गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात कायम पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. शहराबरोबरच उपनगरांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून काही वर्षांपासून 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना रडत-खडत सुरू असल्याने अद्यापही येथील पाणी प्रश्न सुटू शकला नाही. योजनेच्या पाण्याकडे आ वासून बसलेल्या नागरिकांचा मात्र दरवर्षी हिरमोड होत आहे.

Water Supply
Pune Heatwave Temperature: पुण्यात उष्णलहरींचा तडाखा; लोहगावचा पारा 42 अंशांवर

सध्याही परिसरात ठिकठिकाणी नागरिकांना विशेषतः महिलांना रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत आहे. तेही अपुरे व कमी दाबाने मिळते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी फक्त आश्वासने देऊन पाणीपुरवठा योजनेच्या कामात चालढकल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येथील कार्यकर्ते पल्लवी व प्रशांत सुरसे यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत अनेकवेळा पुणे महानगरपालिकेकडे निवेदने दिली होती. मात्र, दुर्लक्ष होत राहिले. दरम्यान, त्यांनी पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन योजनेबाबत लेखी स्वरूपात स्पष्ट भूमिका मागविण्यात आली होती. त्याबाबत खुलासा न झाल्यास 30 मार्चपासून उपोषणाचा इशारा दिला होता.

Water Supply
Pune Rangyatra App: ‘रंगयात्रा’ ॲपला थंड प्रतिसाद; नाट्यगृह वाटप पुन्हा जुन्या पद्धतीने

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्या सोबत या प्रश्नाबाबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार संत गजानन महाराज मंदिर, काळे बोराटेनगर येथील 35 लाख लिटर क्षमतेची योजना येत्या पाच-सहा एप्रिलदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. तर, हडपसर बस डेपो गाडीतळ येथील 45 लाख लिटर क्षमता असणारी योजना 15 ते 20 एप्रिलदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. तसे, आश्वासन पत्रही या वेळी सुरसे यांना देण्यात आले आहे. समान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय मोहिते, उपअभियंता गोपाल भंडारे, नगरसेवक मारुती तुपे, जैन इरिगेशनचे प्रकल्प व्यवस्थापक रितेश पाटील तसेच, मनोज जाधव, पल्लवी सुरसे, नंदकुमार आजोतीकर, लखन काळे आदी उपस्थित होते. काळेबोराटेनगर येथील योजनेतून गल्ली क्रमांक 1 ते 15, महादेव मंदिर परिसर, मंत्रा सोसा, निर्मल टाउनशिप ते ओक विस्टा, वर्धमान टाउनशिप, तोडकर टाउनशिप, बिनावत टाउनशिप, अमित हाईट्‌‍स, प्रतिभा रेसिडेन्सी, रिद्धी सिद्धी सोसायटी, भारत फोर्ज कॉलनी, डी मार्ट परिसर, समृद्धी हॉटेल रोड, सिम्पल पार्क व काळे कॉलनीपर्यंत परिसराला पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे.

Water Supply
Pune Municipal Recruitment Exam Centres: महापालिका भरती परीक्षा वादात; दूरच्या केंद्रांमुळे उमेदवार संतप्त

हडपसर बस डेपो येथील योजनेतून हडपसर गावठाण, समाट गार्डन, लोहिया गार्डनपर्यंत, रामोशी आळी, पांढरे मळा, मंत्री मार्केट, अमर नगरी, लोकसेवा हनुमान मंदिर रोड परिसर, गाडीतळ, साईनाथ वसाहत, उत्कर्षनगर सोसायटी, उन्नतीनगर, अमर बाग, अमरलता सोसायटी आदी परिसराला पाणीपुरवठा होणार आहे. या दोन्ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर तुकाई टेकडी येथील कार्यान्वित योजनेतून सातववाडी, गोंधळेनगर, महात्मा फुले वसाहत, शनिमंदिर रोड, जनसेवा सोसायटी, ओंकार कॉलनी, यशराज सोसायटी, शिवउन्नती रेसिडेन्सी, ड्रीम व्हील सोसायटी, काळेपडळ पोलिस चौकीसमोरील परिसर, प्रगतीनगर आदी परिसरास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

आनंदनगरमधील टाकीला लागणार एक वर्ष

आनंद नगरमधील 35 लाख लिटर क्षमतेच्या दोन पाणीपुरवठा पाकळ्यांचे काम अपूर्ण आहे. या योजनांसाठी स्वतंत्र मे. कृषिराज या कंपनीची नेमणूक केली आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी जाणार आहे. या योजनेतून पंधरा नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, नेताजी सुभाषचंद्र सहकारी, इंद्रप्रस्थ, साधना, पारिजात, रवी दर्शन सोसायटी परिसराला पाणीपुरवठा होणार असल्याचे उपअभियंता गोपाल भंडारे यांनी सांगितले.

अनेक वर्षांपासून हडपसरचे नागरिक पुरेशा पाण्याची वाट पाहत आहेत. कर भरूनही पाण्यापासून वंचित राहणे ही येथील नागरिकांच्या दृष्टीने दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आता दिलेल्या मुदतीत या योजना सुरू न झाल्यास मे महिन्यापासून पालिका प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन उभारले जाईल.

पल्लवी सुरसे, अध्यक्ष, स्वाभिमानी महिला संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news