Pune Heatwave Temperature: पुण्यात उष्णलहरींचा तडाखा; लोहगावचा पारा 42 अंशांवर

सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा उच्चांक; दुपारी 12 ते 4 दरम्यान नागरिक हैराण
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरात उष्णलहरींचा उद्रेक सुरूच असून, गुरुवारी सलग दुसऱ्यांदा लोहगावचा पारा 42 अंशांवर गेला होता. दुपारी 12 ते 4 पर्यंत जणू वणवा पेटावा, असे वातावरण तयार झाले होते. शहरातील कमाल तापमान सतत 40 ते 41 अंशांवर स्थिर आहे. एप्रिलच्या पंधरा दिवसांत लोहगाव भागाचा पारा दोनवेळा 42 अंशांवर गेल्याने थंड पुणे आता विदर्भ, मराठवाड्याच्या रांगेत गेल्याची चर्चा नागरिकांत होती. दिवसभर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी दिसत होती.

गुरुवारचे कमाल तापमान

शिवाजीनगर 40, पाषाण 40, लोहगाव 42, चिंचवड 39, लवळे 40, मगरपट्टा 40, एनडीए 39, कोरेगाव पार्क 40.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news