Pune Election Campaign: एका फोनवर मदत, तर कुठे तीर्थयात्रा मोफत!

एका फोनवर मदत, मोफत तीर्थयात्रा, स्कूटी प्रशिक्षण, संगीत रजनीसारख्या घोषणांनी मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ
महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभने दाखवणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.
महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभने दाखवणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.Pudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर आता शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. आरक्षण सोडतीत मतदार संघ अनुकूल झाल्याने तिकीट न मिळता आता काहीं गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरात जागो जागी या इच्छुकांनी फ्लेक्स लावले असून या माध्यमातून मतदारांना विविध प्रलोभने दिली जात आहेत. काही माननीयांनी ‌‘एका फोन कॉलवर थेट मदत‌’ तर काहींनी तीर्थ यात्रेची प्रलोभने दिली आहेत. तर काहींनी महिलांसाठी टू-व्हीलर प्रशिक्षणाचे देखील प्रलोभन देत फलकबाजी सुरू केली आहे. (Latest Pune News)

महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभने दाखवणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.
Pune Metro Pre Wedding Shoot: पुणे मेट्रोत परवानगीशिवाय ‘प्री-वेडिंग शूट’; प्रशासनाचा संताप, कपलवर कारवाईची तयारी

महापालिका निवडणुकांसाठीची आरक्षणाची सोडत जाहीर होताच मंगळवारी शहरातील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले. सोडतीनंतर विविध प्रभागांमध्ये आरक्षण निश्चित होताच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची चाके फिरवण्यास सुरुवात केली. या वेळी सोशल मीडियावर उमेदवारांच्या नावासह समर्थनाच्या पोस्ट, बॅनर, शुभेच्छा संदेशांचा वर्षाव झाल्याचे दिसून आले. व्हॉट्‌‍स ॲप, फेसबुक, इन्स्टाग््राामवरून मतदारांपर्यंत पोहचण्याची चढाओढ सुरू झाली. प्रभागातील आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवारीचा मार्ग सुकर झाल्याने सर्वपक्षीय इच्छुकांनी निःश्वास सोडत सोशल मीडियावर प्रचाराचा नारळ फोडला.

आपला माणूस, जनतेच्या मनातील नगरसेवक, भावी नगरसेवक, आपल्या हक्काचा माणूस, अपकमिंग कॉर्पोरेटर आदी आशयाचे फ्लेक्स तसेच व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत. याद्वारे आपण इच्छुक असल्याचे जाहीर करीत आपली कामे व आगामी योजना मांडल्या, तर काहींनी संवाद साधून जनतेशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केल्याने शहरात प्रचाराचा नारळ फुटल्याचे वातावरण तयार झाले आहे.

महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभने दाखवणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.
School Students Safety: शाळांनो, विद्यार्थी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहा!

या प्रचार स्पर्धेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांनी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांचे फ्लेक्स शहरात झळकू लागले आहेत. काही ठिकाणी ‌‘एका फोनवर मदत‌’ देणारे उमेदवार नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आश्वासन देत आहेत, तर काही ठिकाणी फ्लेक्सवर उमेदवारांच्या नावासोबत ‌‘आपल्या सेवेस तत्पर‌’, ‌‘आपला साथीदार प्रत्येक संकटात‌’ किंवा ‌‘तीर्थयात्रा मोफत, संपर्क साधा‌’ अशा घोषणा झळकत आहेत.

कोथरूडमध्ये मोफत ‌’संगीत रजनी‌’

कोथरूड भागातील एका इच्छुकाने आपल्या प्रभागातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी मोफत संगीत रजनीचे आयोजन केले आहे.

शहरात मतदारांना खुश करण्याची स्पर्धा

निवडणूक आयोगाने आचारसंहिता अद्याप लागू केलेली नसली, तरीही या फलकबाजीमुळे निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक प्रारंभ झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. नागरिकांमध्येही या फलकांमुळे उत्सुकता निर्माण झाली असून, प्रत्येक जण आपापल्या परीने मतदारांना खुश करण्याच्या स्पर्धेत उतरला असल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे

महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरात मतदारांना खुश करण्यासाठी प्रलोभने दाखवणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत.
Shrikant Shirole Political Journey: पहिलीच निवडणूक गेली होती कोर्टात

मोफत स्कूटी प्रशिक्षण ते हरीहरेश्वर तीर्थ यात्रेची प्रलोभने

निवडणूक म्हटले की मतदारांना खुश करण्यासाठी विविध क्लृप्त्या इच्छुक अवलंबत असतात. महापालिका निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भेट वस्तूपासून ते प्रशिक्षण शिबिर व सहलींचे आयोजन केले जात आहे. पुण्यातील काही भागात काहींनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्कूटी प्रशिक्षणाचे प्रलोभन दाखवले आहे. स्कूटी शिका, स्मार्ट व्हा, स्वावलंबी व्हा! अशा ओळी देखील फ्लेक्सवर लिहिल्या असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे हा फलक मनोरंजन करत आहे.

काहींनी प्रशिक्षण शिबिर तर स्मार्ट कार्ड काढण्याच्या मोफत ऑफर देखील दिल्या आहेत. तर काहींनी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणत पाणी, ड्रेनेज अशा समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहेत. धनकवडी, वारजे, पर्वती, पाषाण, सूस, कोथरूडसह विविध भागांत असे फलक आता झळकू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news