Drug Free Pune: पुण्यात ‘ड्रग फ्री’ मोहिमेचा धडाका; 22 पोलिस ठाण्यांवर कारवाईचे लक्ष्य

अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांचा मोठा प्लॅन; नागरिकांच्या सहभागातून शहर ड्रगमुक्त करण्याचा निर्धार
Drug
DrugPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील बावीस पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तुलनेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विश्लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा आराखडा तयार करून ‌‘ड्रग फ्री पुणे‌’ ही मोहीम व्यापाक प्रमाणावर राबविण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर आता प्रत्येक परिमंडळ (झोन) स्तरावर अमली पदार्थविरोधी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Drug
Pune Municipal Budget 2026: पुणे बजेट 2026-27: आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय

मंगळवारी (दि. 24) सकाळी पोलिस आयुक्तालयात गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अमली पदार्थविरोधी कारवाईबाबत सूचना केल्या. या वेळी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले, शहरात अमली पदार्थांबाबत मोठी कारवाई सुरू केली आहे. एकाच वेळी गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यांची पथके या कारवाईत सहभागी असतील. नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी अमली पदार्थ विक्री, तस्करी होणाऱ्या ठिकाणांची माहिती पोलिसांना द्यावी. त्यासाठी लवकरच पोलिस एक ॲप तयार करणार आहेत. त्यामध्ये माहिती देणाऱ्यांना गोपनीयतेची हमी देण्यात आली आहे.

Drug
Pune Municipal Budget 2026: पुण्यात ‘शहरी गरीब आरोग्य योजना’ला अजितदादांचे नाव; उपचार मदत वाढणार

लक्ष्मीनगर, येरवडा, कोंढवा, काळेपडळ, डेक्कन, खडक, शिवाजीनगर, लष्कर, मुंढवा, वानवडी, लोहगाव, वाघोली, खराडी, लोणीकंद, खडकी, सहकारनगर, बाणेर, लोणी काळभोर, वारजे माळवाडी, पर्वती, मार्केट यार्ड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आढावा बैठकीत या पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी कारवाई करण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टिकोनातून टार्गेट ठेवून ही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस आता केवळ अमली पदार्थ विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईवर न थांबता थेट पुरवठा आणि निर्मिती करणाऱ्यांच्या मुळावर घाव घालणार आहेत. दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत आहे. उपनगरे फोफावत आहेत. नोकरी, शिक्षण, व्यवसाय, कामानिमित्त येथे वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याच संधीचा फायदा घेत अमली पदार्थतस्करांनी आपले जाळे तयार केले आहे.

Drug
Pune Municipal Budget 2026: ‘फिट पुणे’साठी क्रीडा क्षेत्रात मोठी गुंतवणूक; हायपोक्सिक प्रशिक्षण केंद्र उभारणार

लोणीकंद, लोणी काळभोर, वाघोली, हडपसर, कोंढवा ही शहरात प्रवेशाच्या ठिकाणची पोलिस ठाणी आहेत. येथे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते, तर दुसरीकडे शहरातील मध्यवस्तीतील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत देखील अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे दिसून येते. काळेपडळ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नायजेरियन तस्करांचा राबता आहे. त्यांचा देखील बंदोबस्त करण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

Drug
Pune Municipal Budget 2026: पुण्यात 75 महापालिका शाळा ‘रोल मॉडेल’; शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

पानटपऱ्या पोलिसांच्या टार्गेटवर

शहरातील काही पानटपऱ्यांवर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता अशा पानटपऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात अमली पदार्थविरोधी पथकाने लोणी काळभोर येथील एका पानहाऊसवर छापा टाकून पानामध्ये टाकण्यात आलेल्या अमली पदार्थाचा अंशमिश्रित असलेली भुकटी (पावडर) जप्त केली. यावरून शोध घेता असता हिंजवडी येथील जांगेगावातील एका कारखान्यात याचे उत्पादन केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news