Pune doctor negligence case: 11 महिन्याच्या चिमुकलीचा चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मृत्यू, पुण्याच्या 4 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

Pune Todays News: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने नोंदविला.
Doctor negligence case
Doctor negligence casePudhari
Published on
Updated on

Pune Doctor negligence case

महेंद्र कांबळे, पुणे : बालकावर चुकीचे उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून नवी पेठेतील एका रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकेविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे, सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हनुमंत गणपतराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अन्वये गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत गिते यांची मुलगी आदिती (वय ११ महिने) हिला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते.

Doctor negligence case
Pune School Stationary Action: खासगी शाळांना इशारा: पुस्तके व गणवेश खरेदीस सक्ती केल्यास कारवाई

उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव डाॅक्टरांना होती. डाॅक्टर, तसेच परिचारिकेने चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप गिते यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

Doctor negligence case
Pune Illegal Hoardings: पुण्यात अनधिकृत होर्डिंग्जचा गोंधळ; 80 कोटी थकबाकी वसुलीचे आदेश

समितीच्‍या अहवालानंतर गुन्‍हा दाखल

हे प्रकरण चौकशीसाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केली. चौकशीत अकरा महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने नोंदविला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news