Pune Water Supply: दिवाळीत गुरुवारची पाणीकपात शिथिल होणार; स्थायी समितीची मान्यतानगरसेवक सुहास टिंगरे यांच्या मागणीला यश

सणासुदीच्या काळात पाण्याची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न
 Water Cut
Water CutPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्यासाठी गुरुवारी करण्यात येणारी साप्ताहिक पाणीकपात शिथिल करण्याच्या मागणीला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

नगरसेवक तथा स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली होती. सणासुदीच्या काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 Water Cut
Pune Solapur Highway Accident: मातीचा ढिगाऱ्याखाली सापडून एकाच मृत्यू;एक जखमी

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने या काळात घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि अन्य तयारीची कामे केली जातात. तसेच शाळांना दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे मुलांचा वेळ घरी जातो.

 Water Cut
Monterosa Project Pune: बिल्डर, आर्किटेक्टसह दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा; 'माँटेरोझा' गृह प्रकल्पाला महापालिकेचा दणका

त्यामुळे घरातील स्वच्छता आणि सणाच्या तयारीसाठी पाण्याची गरज वाढते. अशा परिस्थितीत दर गुरुवारी होणाऱ्या पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात साप्ताहिक पाणीकपात शिथिल करावी, अशी मागणी टिंगरे यांनी केली होती.

पुणेकरांच्या हिताचा विचार करून टिंगरे यांनी केलेल्या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सणाच्या तयारीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिवाळी अधिक आनंदात साजरी करता येईल.

नागरिकांच्या दैनंदिन गरजा, मुलांच्या शाळेच्या सुट्या आणि सणासुदीच्या काळातील पाण्याची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल सुहास टिंगरे यांनी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.