Pune Solapur Highway Accident: मातीचा ढिगाऱ्याखाली सापडून एकाच मृत्यू;एक जखमी

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरवरील घटना; इंदापूर तालुक्यातील राजवडी येथील घटना
Pune Solapur Highway Accident
Pune Solapur Highway AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

इंदापूर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू असताना पुलाच्या मातीचा भरावा कोसळून त्यामध्ये दोन जण गाडले गेले. त्यातील एका जणाला वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला. ही घटना इंदापूर तालुक्यातील राजवडी या ठिकाणी घडली.

मशरफुल शेख (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे, तर अख्तर (वय २०, दोन्हीही रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल) हा जखमी झाला. जखमीवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटना समजल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत ही घटना दुर्दैवी असून यातील दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

Pune Solapur Highway Accident
Monterosa Project Pune: बिल्डर, आर्किटेक्टसह दोन अभियंत्यांवर कारवाईचा बडगा; 'माँटेरोझा' गृह प्रकल्पाला महापालिकेचा दणका

घटनास्थळी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक विलास नाळे , नगराध्यक्ष भरत शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, पंचायत समिती सदस्य दिलीप भिसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, गफूर सय्यद, अरबाज पठाण, जाकीर पठाण, विशाल चव्हाण, रमेश भोसले यांनी भेट दिली. दरम्यान पोकलेन, जेसीबीच्या साह्याने कामगारांना बाहेर काढण्यात आले.

उड्डाणपूल वाहतूक बंद केली असती तर दुर्घटना टळली असती

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या वाहनांसह वाहतुकीची वर्दळ असते. सेवा रस्त्याचे काम संरक्षण भिंती टाकून सुरू असून देखील उड्डाणपुलाचा भराव्याच्या मातीला विनाकारण उतरल्याने जड वाहतूक सुरू असल्याने हादरे बसून हा मातीचा लगदा खाली कोसळल्याने यात काँक्रीटचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

Pune Solapur Highway Accident
Moshi Dengue Case: मोशीत डेंग्यूचा बळी; आदर्शनगरमधील ३६ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

पुलावरील वाहतूक चालू असल्याने सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली असती तर ही घटना घडली नसती. पुलावरील वाहतूक थांबवून ातीच्या ढिगार्‍याला हात लावू नका, असे वारंवार सांगून देखील संबंधित ठेकेदाराने ऐकले नाही, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास शेळके, रमेश भोसले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.