Pune Water Consumption: दिवाळीत पुणेकर गावाला गेले, तरी पाणी वापरात किरकोळ घट; महापालिकेच्या आकडेवारीतून वास्तव समोर

शहरातील पाणी वापर केवळ २० ते २५ एमएलडीने घटला; मात्र पाणीपुरवठ्याचा दाब वाढल्याने कमी दाबाच्या तक्रारींमध्ये मोठी घट
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या सुटीत हजारो नागरिक मूळ गावी गेल्याने पुण्यातील गजबजलेले रस्ते मोकळे झाले आणि वाहतूक कोंडीही कमी झाली. मात्र, शहरातून मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडूनही पुण्याच्या पाण्याच्या वापरात अपेक्षित घट झालेली नाही. दिवाळीच्या कालावधीत पाणी वापरात केवळ २० ते २५ एमएलडीची घट झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Water Supply
Ambegaon Potato Prices: आंबेगावमध्ये बटाट्याचे दर कोसळले; १० ते १२ दिवसांत ३०० रुपयांवरून थेट १५० रुपयांवर घसरण

नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि अन्य कारणांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून नागरिक पुण्यात स्थायिक होत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून, विस्ताराच्या दृष्टीने पुणे महापालिका राज्यातील सर्वांत मोठ्या महापालिकांपैकी एक ठरली आहे. परिणामी, शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्ष वापरही वाढत आहे.

Water Supply
Nira River Water Release: नीरा नदीत पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको; विखे-पाटलांसोबत सोमवारी बैठक

शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने पाण्याची गरज वाढत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. या पार्श्वभूमीवर शहराचा पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी महापालिकेकडून राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागाकडे सातत्याने केली जात आहे. दरम्यान, पुण्यात स्थायिक झालेले अनेक नागरिक दरवर्षी दिवाळी सणासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे शहरातील वाहतूक कमी होऊन रस्ते मोकळे होतात. यंदाही दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक शहराबाहेर गेले. मात्र, नागरिकांची संख्या कमी होऊनही पाणी वापरात फारसा फरक पडलेला नाही.

Water Supply
Pashan Baner Link Road: पाषाण-बाणेर लिंक रोडचा २१ वर्षांचा वनवास संपणार; ३६ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात पाण्याचा वापर केवळ २० ते २५ एमएलडीने कमी झाला. मात्र, या घटीनंतर पाणीपुरवठ्याचा दाब वाढल्याने कमी दाबाने पाणी येणे आणि पाणीटंचाईच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. अनेक भागांतील तक्रारी जवळपास थांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागांमध्ये पाणी पोहचत नव्हते, तेथेही या कालावधीत पाणी पोहचल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Water Supply
Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सव दिल्लीच्या पुस्तक मेळ्यालाही मागे टाकणार; गणेशोत्सवाप्रमाणे ऐतिहासिक लोकोत्सव होण्याचा विश्वास

महापालिकेने कोणत्या दिवशी किती पाणी उचलले?

दिवाळीचा पहिला दिवस ५ नोव्हेंबर रोजी होता. त्या दिवशी महापालिकेने १,७१८ एमएलडी पाणी उचलले. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला १,७०० एमएलडी पाणी उचलण्यात आले. त्यानंतर ७ नोव्हेंबरपासून अनुक्रमे १,६८८ एमएलडी, १,६८२ एमएलडी, १,६९८ एमएलडी, १,६९७ एमएलडी आणि १,६९२ एमएलडी पाणी उचलण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.