पुणे : दरवर्षीप्रमाणे या दिवाळीतही पुणे शहराने एक अनोखा अनुभव घेतला. सलग सुट्या आणि दिवाळीनिमित्त चाकरमानी आपल्या गावी परतल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व शुकशुकाट पाहायला मिळाला.(Latest Pune News)
ज्या रस्त्यांवर रोज वाहनांची मोठी गर्दी असते, ते रस्ते एकदम मोकळे झाल्यामुळे सोमवारी (दि. 20) पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
बाणेर, हिंजवडी, खराडी यांसारख्या आयटी पट्ट्यात आणि सदाशिव पेठ, लक्ष्मी रोडसारख्या मध्यवर्ती भागातही अत्यंत कमी वाहतूक सोमवारी दिसली. नेहमी गजबजलेली ठिकाणे एकदम शांत झाली, त्यामुळे अनेक मूळ पुणेकरांनी सोशल मीडियावर आनंद याबाबत आनंदही व्यक्त केला.
आम्ही गेलो म्हणून शांतता, पण शहराची अर्थव्यवस्था चालवणारे कोण? असा सवाल करत नॉन-पुणेकरांनी मूळ पुणेकरांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या विनोदी आणि कधीकधी टोकाच्या कमेंट्समुळे सोशल मीडियावर सध्या पुणेकर विरुद्ध नॉन-पुणेकर यांच्यातील चर्चांना उधाण आले आहे. एकंदरीत, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुण्याच्या रस्त्यावर शांतता असली तरी, सोशल मीडिया मात्र या शुकशुकाटावरून चांगलाच तापला आहे.म्हणे आता शुद्ध हवा मिळतेय...
पुण्यातील या शांततेमुळे सोशल मीडियावर एक वेगळेच ट्रोल वॉर सुरू झाले आहे. अनेक मूळ पुणेकर मीम्स आणि पोस्ट्सद्वारे पुणे पुन्हा एकदा पुणे झाले आहे किंवा आता शुद्ध हवा मिळतेय. अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत आहेत. पुणेकरांच्या या प्रतिक्रियांना नॉन-पुणेकर (नोकरी/शिक्षणानिमित्त शहरात राहणारे) जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.