Pune Heavy Rain Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस; घाटमाथ्यावर ३१० मिमीपर्यंत नोंद, ५० ठिकाणी झाडे कोसळली

96 तासांपासून संततधार सुरू; घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा रेड अलर्ट, शहरात झाडपडीच्या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdatePudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 96 तासापासून पाऊस सुरू असून अत्यंत संथगतीने संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पाऊस असल्याने तो जमिनीत खोलवर मुरण्यास वेळ लागला.

Maharashtra Rain Update
Baramati Farmers Rain Issue: बारामती पश्चिम भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत; उस लागवड व खरीप हंगाम संकटात

मात्र जमिनीचे पोट भरताच शहरात50 ठिकाणी झाड पडी झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ सुरू आहे. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावर 150 ते तब्बल 310 मिमी इतकी नोंद झाली आहे. आगामी 24 तास घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून 7 जुलै पर्यंत असाच पाऊस राहणार आहे.शहरातील पाऊस मात्र सोमवारपासून कमी होत असून हलका ते मध्यम पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Maharashtra Rain Update
Manchar Vegetable Price: मंचर बाजारात कोथिंबीर-मेथीचे विक्रमी दर; पावसामुळे आवक घटली, शेतकऱ्यांना दिलासा

पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून म्हणजेच 96 तासापासून संततधार सुरू आहे.घाटमाथ्यावर चार दिवसापासून अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिल्याने त्या भागात अति मुसळधार तर जिल्हा आणि शहरात संततधार सुरू आहे.या पावसाने संपूर्ण जिल्हयासह पुणे पिंपरी चिंचवड भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र चिखल आणि सखल भागात तळी साचली आहे. रस्त्यावरून जाताना वाहने सावकाश चालवावीत तसेच झाडपडीच्या घटनांपासून सावध राहावे असे आवाहन हवामान विभागासह महापालिकेने केले आहे.

Maharashtra Rain Update
AI Dindi Wari: पालखी सोहळ्यात एआय दिंडीचा उत्साह; आयटी-एआय दिंडीत ५ हजारांहून अधिक वारकरी सहभागी होणार

पुणे जिल्हा :५ जुलै पाऊस(मिमी)

  • निमगिरी:121.5

  • चिंचवड:77

  • माळीण:63.5

  • भोर:55.5

  • दापोडी:43.5

  • राजगुरूनगर:42.5

  • एनडीए:40

  • डुडूळगाव:39

  • नारायणगाव:36

  • पाषाण:33.4

  • शिवाजीनगर:30.7

  • शिरूर:22.5

  • लवळे:15.5

  • हवेली:14.5

  • तळेगाव:3.5

  • बारामती:3.4

  • दौंड:2.5

Maharashtra Rain Update
Pune Police Nameplate Rule: पुणे पोलिसांचा कडक आदेश! नेमप्लेट झाकली तर शिस्तभंगाची कारवाई

घाट माथ्यावरील 24 तासातला पाऊस

  • लोणावळा:२६३

  • शिरगाव:२७५

  • शिरोटा:११२

  • ठाकूरवाडी:१२२

  • वळवण:२२९

  • अंबोणे:२४९

  • भिवपुरी:१५४

  • दावडी:२६८

  • डोंगरवाडी :३९८

  • कोयना:२१०

  • खोपोली:२८५

  • खांड:१६५

  • ताम्हिणी:३१०

  • भिरा:३८६

  • धारावी:१३५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news