Pune Marathon 2026: पुण्यात सहा महिन्यांत तब्बल २६ मॅरेथॉन; ‘रनिंग कल्चर’ला वेग, पण अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?

सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन; ॲथलेटिक्स संघटनांच्या परवानगीबाबत प्रश्नचिन्ह
Marathon
MarathonPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे: पुणे शहर आणि परिसरातील धावपटूंसाठी हे वर्ष विशेष ठरणार असून, सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत तब्बल २६ मॅरेथॉन व धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. विविध संस्था आणि आयोजकांच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धांमुळे पुण्याच्या 'रनिंग कल्चर'ला आणखी चालना मिळणार आहे.

Marathon
Pune Ganesh Visarjan Rangoli: पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत रांगोळीतून भेसळीविरोधी जनजागृती

या मॅरेथॉन मालिकेची सुरुवात ६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज मॅरेथॉनने झाली आहे. त्यानंतर १३ सप्टेंबरला एसपीजी १० के रन, २० सप्टेंबरला सिंहगड हाफ मॅरेथॉन, तर २७ सप्टेंबरला पुणे हिल हाफ मॅरेथॉन होणार आहे. ऑक्टोबरमध्ये व्हेटरन्स रन, रनथॉन ऑफ होप आणि पुणे १० के चॅलेंज या स्पर्धा होणार आहेत. नोव्हेंबरमध्येही धावपटूंसाठी विविध पर्याय उपलब्ध असून, 'रन फॉर युनिटी', न्यूट्रिक्रॉस फार्म अल्ट्रा, खडकवासला अल्ट्रा, फेडरल बँक पुणे मॅरेथॉन, बारामती पॉवर मॅरेथॉन आणि साईश्री व्‍हीटालाईफ व्हॅलनेस विटारा रन अशा स्पर्धांचा समावेश आहे.

Marathon
Pune Ganeshotsav: शिवाजीनगरात देखाव्यांची पर्वणी; गड-किल्ल्यांपासून स्वामी समर्थांच्या जीवनकार्यापर्यंत; इतिहास-धर्माचा जागर

डिसेंबरमध्ये पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, एमआयटी अल्ट्रा मॅरेथॉन, एमसीएमसी हाफ मॅरेथॉन, बजाज पुणे मॅरेथॉन, पुणे श्रमिक पत्रकार संघाची क्‍वार्टर मॅरेथॉन आणि येरवडा मॅरेथॉन अशा स्पर्धा होणार आहेत. जानेवारी २०२७ मध्ये पुणे एकल रन मॅरेथॉन, 'चला भारत वॉकथॉन पुणे' आणि पुणे १० के चॅलेंजचे आयोजन केले आहे.

Marathon
Pune Traditional Ganesh Idols: पुण्याच्या बाप्पाची १३० वर्षांची परंपरा; मूर्ती बदलली, पण पर्यावरणभान कायम

फेब्रुवारीमध्ये पुणेकरांसाठी आणखी चार स्पर्धा असून, पुणेकर हाफ मॅरेथॉन, रन इन्सिंक आणि पुणे वुमेन्स हाफ मॅरेथॉनचा त्यात समावेश आहे. याशिवाय नायट्रथॉनचीही नोंद आहे. अंतिम दोन स्पर्धांच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. या मॅरेथॉनमुळे नवोदित धावपटूंपासून अनुभवी धावपटूंपर्यंत सर्वांना वर्षभर विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Marathon
Pune Ganeshotsav Traffic Congestion: मंडप रस्त्यावर, देखावे रस्त्यावर, वादनही रस्त्यावर; पुणेकरांचा सवाल, ‘मग आम्ही जायचे कुठून?’

मात्र अपघाताची जबाबदारी कोणाची

पुणे शहरात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन या मॅरेथॉन व्यतिरिक्‍त फारसा मॅरेथॉन स्‍पर्धा होत नव्‍हत्या. परंतु, या वर्षी केवळ सहा महिन्यात तब्‍बल २६ मॅरेथॉनचे नियोजन झालेले आहे. या सर्वच मॅरेथॉन आयोजकांनी ॲथलेटिक्‍स संघटनांची परवानगी काढलेली नसते. त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे.

यावर्षी पुणे शहरात अनेक मॅरेथॉन स्‍पर्धांचे आयोजन केले आहे. वास्‍तविक त्याबाबत पुणे जिल्हा ॲथलेटिक्‍स असोसिएशनकडून परवानगी देण्याचा अधिकार नसला तरी असोसिएशनला माहिती देणे अपेक्षित आहे. आमच्या पर्यंत आयोजकांनी संपर्क केला तर आमचे सहकार्य राहत असते. परंतु, ज्या आयोजकांकडून विचारणा होत नाही. त्यांच्या बाबत आम्‍ही जबाबदारी घेत नाही.

राजीव कुलकर्णी, सरचिटणीस, पुणे जिल्‍हा ॲथलेटिक्‍स असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news