Pune Dhulivandan Meat Sales: धुळवडीला चंद्रग्रहणाचे सावट; दिवसभर मांसाहाराला ब्रेक, संध्याकाळी बाजारात गर्दी

चिकन विक्री 1100 टनांवरून 700 टनांवर; ग्रहण सुटताच दुकानांवर ग्राहकांची झुंबड
Fish
Fish Pudhari
Published on
Updated on

पुणे: होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी होणारी धुळवड म्हणजे खवय्यांसाठी चिकन, मटण आणि मासळीच्या मेजवानीचा दिवस. मात्र, यंदा धुळवडीलाच खग््राास चंद्रग््राहण आणि पौर्णिमा आल्याने मांसाहारप्रेमींच्या उत्साहावर काहीसे सावट पाहायला मिळाले. धार्मिक कारणामुळे दिवसभर मांसाहारी पदार्थांच्या मागणीत मोठी घट झाली असली तरी सायंकाळी ग््राहण सुटल्यानंतर मात्र बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग््रााहकांची झुंबड उडाली.

Fish
Pune Holi Celebration: पुण्यात उत्साहात होळी; सामाजिक उपक्रम, द्राक्षांचा महानैवेद्य आणि विशेष मुलांचा रंगोत्सव

पुणे शहर बॉयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी धुळवडीला सुमारे 1,100 टन चिकनची विक्री होते. मात्र, यंदा हे प्रमाण केवळ 700 टनांवर स्थिरावले. विक्रेत्यांनी आधीच कमी माल भरल्याने टंचाई जाणवली आणि परिणामी चिकनच्या दरात किलोमागे 10 रुपयांची वाढ होऊन तो 240 रुपयांवर पोहोचला.

Fish
Maharashtra Kesari 68th Competition: 68 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा: ‘महाराष्ट्रातून आणखी खाशाबा जाधव घडवायचे’ – मुरलीधर मोहोळ

मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, मटण मार्केटमध्ये दररोजच्या तुलनेत 1,000 ते 1,200 बोकडांची आवक झाली. मटणाचे दर 800 रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिले. मासळी बाजारातही आंध प्रदेश आणि स्थानिक भागातून 25 ते 30 टन आवक झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मागणी नसल्याने मासळीचे भाव वाढले नाहीत.

Fish
Shirur Taluka Future MLA: शिरूर तालुक्यात ‘भावी आमदारां’ची चलती; स्थानिक निवडणुकांनंतर नवे राजकीय समीकरण

खोल समुद्र, नदी, खाडी तसेच आंध प्रदेश येथून रहू, कतला, सिलनची मिळून गणेश पेठेतील बाजारात 25 ते 30 टन मासळीची आवक झाली. ही आवक नेहमीच्या प्रमाणात आहे. धुळवडमुळे जास्त आवक झाली नाही. मागणीही कमीच आहे. मासळीचे भाव स्थिर असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकुर परदेशी यांनी सांगितले.

Fish
Maharashtra Rising Temperature: फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; पुरंदर तालुक्यात तापमान वाढीचा आरोग्यावर परिणाम

दिवसभर पौर्णिमा आणि चंद्रग््राहण पाळणाऱ्या नागरिकांनी सायंकाळी 6 नंतर चिकन आणि मटण दुकानांवर गर्दी केली. सकाळी ग््रााहकांची संख्या तुरळक होती. मात्र, ग््राहण सुटताच मागणीत वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news