

पुणे : आयातीचा मारा आणि कमी प्रमाणात असलेली मागणी यामुळे गेल्या आठवड्यातही हरभराडाळ, मसूरडाळ, हिरवा वाटाणा, सेलम मटकी दरात आणखी घसरण झाली. पावसामुळे आवक मंदावल्याने गुळाच्या दरात क्विंटलमागे 50 रुपयांनी तर मुबलक कोट्याच्या घोषणेनंतरही साखरेच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ झाल्याचे येथील घाऊक बाजारातून सांगण्यात आले.(Latest Pune News)
पुढील महिन्यातील दिवाळीचा सण लक्षात घेऊन केंद्र सरकारने नोव्हेंबरचा साखरेचा कोटा खूपच लवकर म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी जाहीर केला. वाढीव मागणी लक्षात घेऊन 24 लाख टन साखर खुली करण्यात येणार आहे. हा कोटा पुरेसा असल्याने साखरेचे दर स्थिरावतील असा अंदाज होता. मात्र, कोटयाच्या घोषणेनंतर सटोडियांच्या सक्रियतेमुळे येथील घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे पंचवीस रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 4 हजार 200 ते 4 हजार 225 रुपये होता. सततच्या पावसामुळे गुळाची आवक मंदावली आहे. नवरात्र तसेच त्यानंतर येणाऱ्या दिवाळीच्या सणामुळे गुळास मागणी चांगली आहे. यामुळे सर्व प्रकारच्या गुळाच्या दरात क्विंटलमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली.
खाद्यतेलांस मागणी वाढली
नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीचा सण यामुळे खाद्यतेलांस मागणी वाढू लागली आहे. यामुळे गेले अनेक दिवस स्थिर असलेल्या खाद्यतेलांच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले. आवक जावक साधारण असल्यामुळे वनस्पती तूप आणि खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 4200-4225 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2350-2450, रिफाईंड तेल 2200-2750, सरकी तेल 2050-2400, सोयाबीन तेल 1930-2150, पामतेल 1900-2100, सूर्यफूल रिफाईंड तेल 2030-2200, वनस्पती 1900-2250, खोबरेल तेल 6000 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 450 0-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 16200-17000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4000-4200,
लोकवन नं. 2 3600-40020, नं.3 3300-3600, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3800-4400, मिलबर 3100 रु. ज्वारी :-गावरान नं. 1 5500-5800, गावरान नं.2 4800-5000, नं.3 3500-3800, दूरी नं.1 3600-4000, दूरीनं.2 3200-3500 रु गूळ :- गूळ नं. 1 4450-4600, गूळ नं.2 4300-4425 गूळ नं.3 4150-4275, बॉक्स पॅकिंग 4400- 5500 रु. डाळी:- तूरडाळ 9000-10000, हरभराडाळ 7200-7400, मूगडाळ 9000-9700, मसूरडाळ 7300- 7400, मटकीडाळ 8300-8400, उडीदडाळ 10000-10500 रु. कडधान्ये:-हरभरा 6500-6600, हुलगा 4800-5000 चवळी 7000-10000, मसूर 6900-7000, मूग 9000-9200, मटकी गावरान 12000, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 6800- 7000, मटकी राजस्थान 6800-7000, मटकी सेलम 15000-15000, वाटाणा हिरवा 13000- 13500, वाटाणा पांढरा 4100-4200, काबुली चणा 7500-11000 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 5500, साबुदाणा नं.2 5000, साबुदाणा नं.3 4800 रु. वरई भगर :-9500-10500, सावा भगर 9000-9500 रु गोटा खोबरे 3200-3400 रु. शेंगदाणा :- जाडा 8500-9500, स्पॅनिश10800, घुंगरु 9500-9800 टीजे 8000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा 2800-3000, मद्रास 5000-5100.डाळी, कडधान्ये मंदीतच
हरभरा आणि मसुरीची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. यामुळे डाळी कडधान्य बाजारात मंदीचेच सावट आहे. भाव घसरत असल्याने मागणीही साधारणच आहे. गेल्या आठवड्यातही हरभरा आणि हरभराडाळीचे दर क्विंटलमागे आणखी शंभर रुपयांनी उतरले. मसूर आणि मसूरडाळीच्या दरातही दोनशे रुपयांनी घट झाली. आवक मुबलक असून मागणी कमी असल्यामुळे हिरवा वाटाणा, काबुली चणा तसेच गावरान आणि सेलम मटकी दरातही क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी घट झाली. अन्य डाळी आणि कडधान्यांचे दर स्थिर होते. अन्नधान्य बाजारात सध्या सामसूम आहे. गहू, ज्वारी, बाजरी तसेच तांदळास मागणी कमी आहे. सर्वसाधासणपणे दसरा, दिवाळी या महत्वाच्या सणाच्या कालावधीत रवा, मैदा, पोहे, सुकामेवा, साखर, खाद्यतेले या जिनसांना मागणी वाढते. त्यामुळे धान्य बाजारात उलाढाल कमी प्रमाणात होते.