

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पडत असलेल्या पावसाने चासकमान धरणामधून भीमा नदीपात्रात सुमारे ३०५०० क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
चास- कङूस-टोकेवाडी दरम्यान भीमा नदीवर असणाऱ्या पुलावरून एक कार जात असताना वाहून जाऊन बुडाली. (Latest Pune News)
शनिवारी (दि. २७) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीवर असणाऱ्या पुलावरून एक कार वाहत गेली असून कारमधील व्यक्ती कारमध्ये असून बुडाल्याची शक्यता आहे.