Society Assault Case: सोसायटीच्या गेटसमोर मद्यपान आणि वाढदिवस सेलिब्रेशन; जाब विचारल्यावर महिलेला मारहाण!

स्वारगेटमधील प्रकार; रात्री उशिरा दारू पिताना आरडाओरड – महिलेला शिवीगाळ, धक्काबुक्की
Society Assault Case
Society Assault CasePudhari
Published on
Updated on

पुणे: सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना रहिवासी महिलेने जाब विचारल्याने तिला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (Latest Pune News)

Society Assault Case
Fake Gang Reel Pimpri: टोळी युद्धाची ‘रील’ बनवून फटाका स्टॉलची जाहिरात; पोलिसांनी केली उचलबांगडी

अरुण विठ्ठल पवार (वय ३८, रा. शालोम सोसायटी, पौर्णिमा टाॅवरजवळ, स्वारगेट) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 38 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Society Assault Case
‌Bhimthadi Selection custard apple variety: ’भीमथडी सिलेक्शन‌’ सीताफळ वाणाला पेटंट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शंकरशेठ रस्त्यावरील शालोम सोसायटीत राहायला आहे. आरोपी पवार याच सोसायटीत राहायला आहे. १३ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता आरोपी पवार आणि त्याचा मित्र सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर दारू पित होते. वाढदिवस साजरा करताना त्यांनी केक कापला. आरडाओरडा ऐकून महिलेने पवार आणि त्याच्यााबरोबर असलेल्या मित्राला जाब विचारला. या कारणावरुन पवारने महिलेला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

Society Assault Case
Zilla Parishad women reservation Junnar: जुन्नरमध्ये महिलाराज! प्रस्थापित दिग्गजांचे स्वप्न धुळीस

दरम्यान, कोथरूडमधील मयूर काॅलनीत एका सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याने सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केल्याची घटना नुकतीच घडली. सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन टोळक्याने धक्काबुक्की केली होती. त्यानंतर आता हा स्वारगेट परिसरातील हा प्रकार समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news