‌Bhimthadi Selection custard apple variety: ’भीमथडी सिलेक्शन‌’ सीताफळ वाणाला पेटंट

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधनाला यश; देशातील पहिले सीताफळ वाण पेटंट मिळवणारे केंद्र ठरले
‌Bhimthadi Selection custard apple variety
बारामती कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेली भीमथडी सिलेक्शन सीताफळे.Pudhari
Published on
Updated on

बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी ‌‘भीमथडी सिलेक्शन‌’ हा सीताफळाचा नवीन वाण सिलेक्शन पद्धतीने विकसित केला आहे. या वाणाला ‌‘पिकवान संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम 2001‌’ नवी दिल्ली यांच्या अंतर्गत स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाला आहे.(Latest Pune News)

‌Bhimthadi Selection custard apple variety
Zilla Parishad women reservation Junnar: जुन्नरमध्ये महिलाराज! प्रस्थापित दिग्गजांचे स्वप्न धुळीस

केंद्रीय कृषी व शेतकरी या अंतर्गत यासंबंधीचे नोंदणी प्रमाणपत्र कृषी विज्ञान केंद्र, बारामतीला मिळाले आहे. सन- 2023 मध्ये पेरूचा ‌‘रत्नदीप‌’ वाणास स्वामित्व व हक्क प्रमाणपत्र मिळाले होते आणि आता सीताफळाच्या ‌‘भीमथडी सिलेक्शन‌’ वाणास सुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. फळ संशोधन केंद्र, संगारेड्डी, तेलंगणा येथील आणलेल्या सीताफळाचा ‌‘बाळानगर‌’ या वाणामधून निवड पद्धतीने ‌‘भीमथडी सिलेक्शन‌’ हा नवीन वाण विकसित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ (उद्यान विद्या) यशवंत जगदाळे यांनी दिली.

‌Bhimthadi Selection custard apple variety
Shirur Women Reservation: शिरूर तालुक्यात महिलाराज! अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले

ते म्हणाले की, सन 2013 पासून कृषी विज्ञान केंद्रमध्ये भीमथडी सिलेक्शन या वाणाच्या निर्मितीचे संशोधन सुरू होते. स्वामित्व हक्क प्रमाणपत्रामुळे या नवीन वाणावर बारामती कृषी विज्ञान केंद्राचा अधिकार असणार आहे. या वाणाचे कलम तयार करणे आणि त्याची विक्री करणे यांचे सर्व अधिकार केंद्राकडे राहणार आहेत.

‌Bhimthadi Selection custard apple variety
Nimgaon Ketki election: निमगाव केतकीत भरणे, पाटील आणि माने यांची प्रतिष्ठेची लढत

या सीताफळ वाणाची नोंदणी करण्याच्या कामात पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पुणे शाखा कार्यालयाचे डेप्युटी रजिस्टार डॉ. शिवाजी गुरव, बेंगलोरच्या भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. टी. सक्तीवेल यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

‌Bhimthadi Selection custard apple variety
Avsari Budruk Sweety case: अवसरी बुद्रुक प्रकरणात नवऱ्यावर गुन्हा; स्वीटीच्या मृत्यूला जबाबदार ठरवले आरोप

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त विष्णुपंत हिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांनी या संशोधनाबद्दल जगदाळे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

‌Bhimthadi Selection custard apple variety
Indapur marigold farming: दिवाळी सणासाठी झेंडू उत्पादक शेतकरी सज्ज

फळे आकर्षक आणि आकाराने मोठी असतात. गरामधील पाकळ्यांची संख्या अधिक, घट्ट आणि रसालदार गर, उत्तम स्वाद आहे. झाडावरील फळांची संख्या 110 ते 150 असून एका फळाचे वजन 320 ते 360 ग्राम असते. बियांचे प्रमाण कमी (30 ते 35) असते. तर फळामध्ये गराचे प्रमाण जास्त आल्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी चांगली मागणी राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news