Pune Crime : पुण्यात दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या आमिषाने मुलीला दुकानात बोलाविले, अन्....
Pune Crime : पुण्यात दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Published on
Updated on

पुणे : पुण्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच असून गुरुवारी (दि. ७) दुधभट्टी परिसरात १० वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. परिसरातील दुकानदारानेच हे कृत्य केले असून पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.

दुधभट्टी गणेश पेठे परिसरात ४७ वर्षीय दुकानदाराने चॉकलेट देण्याच्या आमिषाने मुलीला दुकानात बोलाविले. यानंतर त्याने मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन करताच मुलीने आरडाओर करत स्वत: ची सुटका करून घेतली. मुलीने कुटुंबियांना ही घटना सांगताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

Pune Crime : पुण्यात दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Mulshi crime news: आईस्क्रीम विकणाऱ्या परप्रांतियाकडून गतिमंद मुलीचा विनयभंग; मुळशी तालुक्यातील घटना

पोलिसांनी दुकानदाराला तत्काळ ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून फरासखाना पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Pune Crime : पुण्यात दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार: आजोबावर अल्पवयीन नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news