

Mulshi crime news
मुळशी: मुळशी तालुक्यातील एका गावात दुचाकीवरून फिरुन आईस्क्रीम विकणाऱ्या एका परप्रांतीय विक्रेत्याने गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पिंटू शिवकुमार (सध्या रा. सूस, ता. मुळशी, मुळ रा. चिधरवापुर जनखत कन्नौजतीरवा, उत्तर प्रदेश) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संशयीत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पिडित १४ वर्षीय गतिमंद मुलगी दुपारच्या वेळी आईस्क्रीम विक्रीसाठी घरा जवळ आलेल्या विक्रेत्याकडे आईस्क्रीम घेण्यास आपल्या लहान चुलत बहिणीसह गेली होती. विक्रेता पिंटू शिवकुमार याने पिडितेला आईस्क्रीम देत जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. पिडितेने आरडाओरडा करत घरी धाव घेतली व घडलेली हकीकत घरात सांगितली.
या दरम्यान आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. पालकांसह ग्रामस्थांनी परिसरात त्याचा शोध घेऊन पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पौड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे.
विकृत वासना शमवण्यासाठी आधी चिमुरडीवर अत्याचार... तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबून नराधमाने तिचा दाबलेला हुंकार... चिमुरडी जिवंत आहे की नाही, हे तपासण्यासाठी छातीवर बुक्की मारून केलेला दुर्दैवी अंत... माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नसरापूर येथील घटनेतील असे अनेक उद्विग्न आणि संतप्त करणारे धक्कादायक कंगोरे समोर आले आहेत.
नसरापूर येथील चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याने घटनेच्या तपासाचे गांभीर्य वाढले आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून चिमुरडीवर अमानुष अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया ससून रुग्णालयात 'इन कॅमेरा' पद्धतीने करण्यात आली. या वेळी गुन्हे शाखेचे तज्ज्ञही उपस्थित होते. त्यानंतर रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केला. आरोपीने लैंगिक अत्याचार करून तिचा मृत्यू झाला की नाही, हे पाहण्यासाठी छातीवर जोरात बुक्की मारल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. शवविच्छेदनात चिमुरडीच्या चेहऱ्यावर नखाने ओरबाडल्याच्या खुणा आढळल्या आहेत. या खुणांचेही नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्याची देखील तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तसेच गुप्तांगाला देखील इजा झाल्याचे तपासणीद्वारे आढळून आले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी अंतर्गत अवयवांचे नमुने (व्हिसेरा) जतन करून पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर ससून रुग्णालयाकडून पोलिसांना अंतिम अहवाल दिला जाणार आहे. तिच्या शरीरावरील सर्व जखमांचे नमुने घेण्यात आले असून, बारकाईने तपासणी केली जात आहे.