Pune Crime News :अपहरणासाठी नव्हे तर मैत्रीणीला भेटण्यासाठी घातला बुरखा

Pune Crime News :अपहरणासाठी नव्हे तर मैत्रीणीला भेटण्यासाठी घातला बुरखा

पुणेः पुढारी वृत्तसेवा : दोघांची एकमेकांसोबत मैत्री होती. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजली. त्यांनी त्याला बेदम चोप दिला. शिवाय मुलगीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे तिला भेटणे अवघड झाले. मग काय त्याने देखील नामी शक्कल लढवत चक्क बुरखा परिधान करून तिला भेटण्याचा चंग बांधला. मात्र शाळेच्या परिसरात गेल्यानंतर त्याचे बिंग फुटले अन् हा चव्हाट्यावर आला.

दुसरीकडे बुरखा घालणारा व्यक्ती शाळकरी मुलांचे अपहरण करत असल्याची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. याप्रकरणी, एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र संबधीत आरोपीला आता विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्याने मुलांचे अपहरण करण्यासाठी नव्हे तर आपल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी बुरखा घातल्याचे समोर आले आहे. विजय अमृत वाघरी (वय.23,रा.वाघरी वस्ती, कामराज नगर येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याचं झालं असं, आरोपी विजय हा दुसरीपर्यंत शिकला आहे. तो केटरींगेच काम करतो. त्याची एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री आहे. ही बाब त्या मुलीच्या घरच्यांना समजली. त्यानी विजयला बेदम चोप दिला. तर मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news