Pune Crime : पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे पतीने गळफास घेऊन जीवन संपविले, खेडमधील धक्कादायक प्रकार

चिठ्ठीत आणि व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या माहितीत पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे आणि प्रियकराकडून मिळालेल्या धमक्यांमुळे हे पाऊल उचलल्याचा उल्लेख आहे.
pune crime husband end s his life over wifes affair khed shocking incident
Published on
Updated on

खेड : खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे ३३ वर्षीय भीमा बबन रेणके याने रविवारी (दि. २४) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरात झाडाला गळफास घेऊन जीव संपविले. यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत आणि व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या माहितीत पत्नीच्या प्रेमसंबंधांमुळे आणि प्रियकराकडून मिळालेल्या धमक्यांमुळे हे पाऊल उचलल्याचा उल्लेख आहे.

याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खेड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

pune crime husband end s his life over wifes affair khed shocking incident
Purandar politics: पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा रेणके याने राक्षेवाडी परिसरात गळफास घेऊन जीव संपविले. खेड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली; मात्र, भीमाच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, भीमा याच्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते आणि त्या तरुणाकडून भीमाला सतत धमक्या मिळत होत्या. याबाबत भीमाने खेड पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही, ज्यामुळे निराश होऊन त्याने जीवन संपविले.

pune crime husband end s his life over wifes affair khed shocking incident
Indapur News: इंदापूर तहसीलदारांना शिवीगाळ; मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना मारहाण

भीमाने जीवन संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी, तिचा प्रियकर आणि त्यांना साथ देणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. ही चिठ्ठी त्याने व्हॉट्सॲपवर शेअर केली होती, जी पाहून नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत भीमाने जीवन संपविले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news