Purandar politics: पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार

आगामी स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार
Mahavikas Aghadi
पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडी एकत्र लढणारfile photo
Published on
Updated on

सासवड: पुरंदर तालुका विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्व पक्षांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार केला आहे.

सासवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष अभिजित जगताप, जिल्हाध्यक्ष उल्हास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती दत्ता चव्हाण, बाबूसाहेब माहुरकर, कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप, राहुल गिरमे, गौरी कुंजीर, दत्ता कड, चेतन महाजन, मुरलीधर झुरंगे, राजू बरकडे, गौरव कोलते, शामकांत भिंताडे, स्वाती बरकडे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Pune News)

Mahavikas Aghadi
Bhor News: भोर तालुक्यात राजकीय उलथापालथ; जिल्हा परिषदेची नवी गटरचना जाहीर

या वेळी जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस विजय कोलते म्हणाले की, सासवड, जेजुरी, फुरसुंगी नगरपालिका तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी ताकदीने लढवणार आहे.

या बैठकीत तरुणांना वाव देऊन समाजातील पाठिंबा आणि विश्वास मिळवत आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांनी स्पष्ट केले की, सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उमेदवारी ठरवली जाईल आणि एकत्रित ताकदीने निवडणुका लढवल्या जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news