Night Curfew Pune: रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवा; आम आदमी पक्षाची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे मागणी

हा निर्णय कायमस्वरूपी लागू करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.
Night Curfew Pune
Night Curfew PunePudhari
Published on
Updated on

खडकवासला: पुणे शहर परिसरात टोळीयुद्ध आणि दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. यामुळे नागरिकांत असुरक्षिता निर्माण झाली आहे. रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णयामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल. हा निर्णय कायमस्वरूपी लागू करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.

Night Curfew Pune
Mundhwa Illegal Hoardings Action: मुंढवा परिसरातील अनधिकृत होर्डिंग अखेर हटविले

पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, महासचिव सुभाष करांडे, सुनील सवदी, सागर झा, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे, उमेश दीक्षित, अनिकेत शिंदे, ज्योती जोगदंड, मनोज ओझा आदींनी पोलिस आयुक्तांना याबाबतचे निवदेन दिले. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात दोन आठवडे जमावबंदी लागू केली. तसेच रात्री दहानंतर पब, बार, रेस्टॉरंट, हॉटेल बंद ठेवण्याची अमंलबजावणी सुरू केली.

Night Curfew Pune
Pune Nasrapur Case: चिमुकलीवर मृत्यूपूर्वी क्रूरपणे अत्याचार; ससूनच्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष

सिंहगड रोड, वारजे, धायरी, नऱ्हे, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर आदी भागांत संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी या वेळी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आल्याचे बेनकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news