Mundhwa Illegal Hoardings Action: मुंढवा परिसरातील अनधिकृत होर्डिंग अखेर हटविले

आकाशचिन्ह विभागाची कारवाई
Mundhwa Illegal Hoardings Action
Mundhwa Illegal Hoardings ActionPudhari
Published on
Updated on

मुंढवा: ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने मुंढवा येथील अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई केली. परिसरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नसल्याचे वृत्त दै. ‌‘पुढारी‌’ने नुकतेच प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत प्रशासने परिसरातील अनधिकृत जाहिरात फालक हाटविले आहेत.

मुंढवा परिसरात रस्त्याच्या मध्यभागी पददिव्यांच्या खांबांवर, तसेच बांधकामांच्या साईटच्या ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभे होते. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत होते.

Mundhwa Illegal Hoardings Action
Pune Nasrapur Case: चिमुकलीवर मृत्यूपूर्वी क्रूरपणे अत्याचार; ससूनच्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष

प्रशासनाचे परिसरातील अधिकृत जाहिरात फलकांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत दै.‌‘पुढारी‌’ने ‌‘अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणार कधी?‌’ या आशयाचे वृत्त नुकतेच प्रतिसाद केले होते. त्यानंतर आकाशचिन्ह विभागाला खडबडून जाग आली आणि परिसरातील अनधिकृत फलक हाटविण्यात आले.

Mundhwa Illegal Hoardings Action
World Environment Day: महाराष्ट्राच्या मातीत बहरले ‌'प्राणवायूचे लेणे‌'

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदिप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त भास्कर महाडीक आणि आकाचिन्ह विभागाचे परवाना निरीक्षक स्वागत शेंडगे यांनी क्रेन आणि गॅस कटरच्या सहाय्याने ही कारवाई केली.

आकाचिन्ह विभागाच्या पथकाकडून गुरूवारी पहाटे या कारवाईवाला सुरुवात करण्यात आली होती. महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग, फ्लेक्स व बॅनर लावले तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे या वेळी शेंडगे यांनी सांगितले. दरम्यान, अनधिकृत जाहिरात फलक हाटविण्यात आल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news