Pune Nasrapur Case: चिमुकलीवर मृत्यूपूर्वी क्रूरपणे अत्याचार; ससूनच्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
Pune Nasrapur Case
Pune Nasrapur CasePudhari
Published on
Updated on

पुणे: नसरापूर येथील चिमुकलीच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे ससून रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी गुरुवारी (दि. 4) न्यायालयात साक्षीदरम्यान सांगितले. या प्रकरणाच्या सुनावणी वेळी सात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

चिमुकलीच्या शरीरावर आढळलेले ओरखडे हे कोणत्याही हत्याराचे नसून, आरोपी सोबत झालेल्या झटापटीदरम्यान पडलेले आहेत. तसेच, पीडितेला मारण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता.

Pune Nasrapur Case
World Environment Day: महाराष्ट्राच्या मातीत बहरले ‌'प्राणवायूचे लेणे‌'

यावर डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे न्यायालयात शिक्कामोर्तब केले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी या साक्ष नोंदविल्या, तर बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी उलटतपासणी घेतली. तक्रारदार पीडित कुटुंबातर्फे ॲड. मनीष पाडेकर हजर होते.

या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65, रा. भोर) याच्या विरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या खटल्यात एकूण 82 साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर केली आहे.

Pune Nasrapur Case
NDA Women Cadets Officers: एनडीएमधून 53 मुली गेल्या सैन्यदलात अधिकारी पदावर; कॅडेट श्रीती दक्षने मिळवले राष्ट्रपतींचे पहिले सुवर्ण

त्यापैकी आत्तापर्यंत एकूण 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यामध्ये पीडितेचे कुटुंबीय, स्थानिक शोधपथक, सीसीटीव्ही फुटेजशी संबंधित साक्षीदार, पंच, ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि बाल-साक्षीदारांचा समावेश आहे. शुक्रवारी (दि. 5) न्यायवैद्यक प्रयोगशाळा (एफएसएल) मधील तज्ज्ञांची साक्ष नोंदविली जाणार आहे.

‌‘पोटन्सी‌’ आणि मानसिक चाचणीची साक्ष

आरोपीची लैंगिक क्षमता तपासण्यासाठी केलेल्या ‌‘पोटन्सी टेस्ट‌’ संबंधित डॉक्टरांची साक्ष घेण्यात आली. यासोबतच, घटनेच्या वेळी आरोपीचे मानसिक संतुलन कसे होते, तो निर्णय घेण्यास सक्षम होता की नाही हे तपासणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांची साक्षही न्यायालयात पूर्ण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news