

पुणे: लोकसभा, विधानसभेत भाजपला मिळालेने निर्विवाद यश, देशातील अनेक भागांत मिळालेली सत्ता, यामुळे येणारी महानगरपालिका निवडूक ही भाजपच्या तिकिटावर लढण्यास अनेक इच्छुक उत्सुक असल्याचे अर्ज वितरण करण्याच्या दुसऱ्या दिवशी देखील स्पष्ट झाले. मंगळवारी तब्बल 350 इच्छुकांनी अर्ज नेले. सोमवारी व मंगळवारी मिळून तब्बल अडीच हजार अर्ज वितरित करण्यात आले, तर 2000 उमेदवारांनी अर्ज जमा केल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. भाजपसह राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्षाच्या तब्बल 350 इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिली. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉंग््रेासने देखील अर्ज वितरण करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी 185 इच्छुकांनी अर्ज विकत घेतले.
महापालिका निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत निवडणूक आचारसंहिता लागण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रभागरचना व आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे, तर प्रारूप मतदारयाद्यांची कामे सुरू आहेत. कोर्टाने दिलेल्या निकालानुसार, निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपसह, राष्ट्रवादी कॉंग््रेास, कॉंग््रेासने देखील अर्ज वितरित करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेवरील सत्ता कायम राखण्यासाठी भाजप अनेक नवे तसेच अनुभवी चेहरे मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. मागील पाच वर्षांत झालेल्या प्रभागनिहाय कामांमुळे आणि शहरात पक्षसंघटनेच्या वाढलेल्या बळामुळे अर्जांच्या मागणीत मोठी वाढ झाली. मंगळवार अर्ज वितरित करण्याचा शेवटचा दिवस होता. मंगळवारी 350 इच्छुकांनी अर्ज नेले, तर 2000 इच्छुकांनी अर्ज जमा केले. बुधवारपासून प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार असून, एका दिवशी चार ते पाच प्रभागांच्या बैठका घेण्यात येणार असल्याचे धीरज घाटे यांनी सांगितले.
सोमवारी 200 तर मंगळवारी 350 इच्छुकांनी घेतले अर्ज
राष्ट्रवादी कॉंग््रेास अजित पवार गटाने देखील सोमवारपासून अर्ज विक्रीस सुरुवात केली आहे. सोमवारी 200 इच्छुकांनी अर्ज विकत घेतले होते, तर मंगळवारी 350 इच्छुकांनी अर्ज नेल्याचे प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग््रेासच्या उमेदवारी अर्जासाठी शुल्क ठेवण्यात आले आहे. ओपन-ओबीसीसाठी 20 हजार, तर एससी-एसटीसाठी 10 हजार शुल्क आकारले जात आहे . असे असताना देखील मोठ्या प्रमाणात इच्छुक अर्ज घेऊन जात आहेत. अर्जविक्री आणि स्वीकारण्याची मुदत 8 ते 18 डिसेंबर अशी दहा दिवस राहणार आहे. पहिल्या दिवशी आजी-माजी नगरसेवक, महिला प्रतिनिधी, युवक नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हे अर्ज विकत घेतले. दुसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांसह इच्छुक पक्ष कार्यालयात दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यालय गजबजून गेले होते. राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून आत्तापर्यंत 266 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत, तर सव्वादोनशेहून अधिक जणांनी पक्षाकडे अर्ज भरून जमा केले आहेत. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप अर्जवाटप सुरू झालेले नाही.
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग््रेासच्या अर्ज विक्रीला सुरुवात
काँग््रेास पक्षाच्या नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवारपासून महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे शहर व जिल्हा काँग््रेास कमिटीच्या वतीने इच्छुक उमेदवारांना अर्जवाटप करण्यात आले. अर्जवाटपाच्या पहिल्याच दिवशी पुणे शहर जिल्हा काँग््रेास कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत 185 इच्छुकांनी अर्ज घेतले. शहरातील सर्व प्रभागांतून अर्ज घेण्यासाठी इच्छुकांनी चांगला प्रतिसाद दिला. उमेदवारी अर्जवाटप व स्वीकारण्याची मुदत शनिवार 13 डिसेंबरपर्यंत आहे.