Pune Consumer Commission Water Supply Case: पाणीपुरवठा बंद केल्याप्रकरणी बिल्डरला दणका

ग्राहक आयोगाचे आदेश; अंतिम निर्णयापर्यंत पाणी सुरू ठेवण्याचे निर्देश
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

पुणे: उन्हाळ्याच्या तीवतेत सदनिकेचा पाणीपुरवठा बंद केल्याप्रकरणी अतिरिक्त पुणे जिल्हा ग््रााहक तक्रार निवारण आयोगाने गणराज डेव्हलपर्ससह त्याच्या संचालकांना चांगलाच झटका दिला आहे. तक्रारदाराच्या सदनिकेचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश देत पुढील सुनावणीपर्यंत तो बंद न करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्य प्रणाली सावंत आणि सदस्य कांचन गंगाधरे यांनी हा निकाल दिला.

Water Supply
Pune PSI Bribe Case: पुण्यात PSI 80 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

याबाबत राजाभाऊ क्षीरसागर यांनी तक्रार आयोगात तक्रार दिली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने यापूर्वी 15 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा खंडित केला होता. त्या वेळी ग््रााहक तक्रारीची नोटीस मिळाल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर बाहेरगावी असताना 27 मार्च 2026 रोजी पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने त्याने ॲड. ज्ञानराज संत यांच्यामार्फत आयोगाकडे धाव घेतली.

Water Supply
Pune HSC Result 2026: बारावी निकालात पुणे जिल्हा अव्वल; विभागाचा निकाल 91.25%

बांधकाम व्यावसायिकाकडून नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच, पाणीपुरवठा बंद करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सदनिकाधारक तक्रारदाराला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा युक्तिवाद ॲड. संत यांनी केला.

Water Supply
Pune breaking | नसरापूर पीडितेच्या नातेवाईक आणि संतप्त नागरिकांनी केला नवले ब्रिज बंद, चार तासापासून मुंबई बंगळूर महामार्ग ठप्प!

पाणी जीवनावश्यक गरज: आयोग

पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. पाणीपुरवठ्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तो बंद करणे हे प्रथमदर्शनी मनमानी व बेकायदेशीर आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकाने योग्य कारण असल्यास आयोगाची परवानगी घेणे आवश्यक होते.

Water Supply
Nasrapur Protest | नसरापुरात वातावरण चिघळले; महामार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर लाठी चार्ज

या पार्श्वभूमीवर आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला तत्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे आणि अंतिम निर्णय होईपर्यंत तो बंद न करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय बेलदरे यांना नोटीस बजावून पुढील सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news