Nasrapur Protest | नसरापुरात वातावरण चिघळले; महामार्गावर पोलिसांचा आंदोलकांवर लाठी चार्ज

घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांचे सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आंदोलक संतप्त
Pune Satara Highway Lathi Charge
पुणे - सातारा महामार्गावर चेलाडी येथे आंदोलकांना बाजूला घेताना पोलीसPudhari
Published on
Updated on

Pune Satara Highway Lathi Charge

माणिक पवार

नसरापूर: नसरापूर येथील साडेतीन वर्षाच्या बालिकेच्या खूनप्रकरणी नसरापूर येथे शनिवारी (दि.२) सकाळपासून नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांचे सकारात्मक उत्तर न मिळाल्याने आंदोलक संतप्त झाले.

त्यांनी पुणे - सातारा महामार्ग अडवून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज करून जमावाला सेवा रस्त्याच्या बाजूला घेतले. तर काही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा काही महिलांनी आरोप केला आहे.

Pune Satara Highway Lathi Charge
Nasrapur Traffic Jam: नसरापूरमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

नसरापूर ( ता. भोर ) येथे एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीच्या खूनप्रकरणी आंदोलकांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, जागेवरच फाशी द्या, अशी मागणी करत पुणे - सातारा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी आगेकूच केली.

मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी तबडतोब धाव घेऊन आंदोलन करणाऱ्यांना बाजूला घेतले. यावेळी काही काळ या परिसरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही वाहन चालकांनी आंदोलकांशी वाद घातला. यावेळी पोलिसांनी महामार्ग मोकळा करून वाहने सोडण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news