Pune Construction Timing Rules: पुण्यात बांधकामांना वेळेचे निर्बंध; सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंतच कामांना परवानगी

वायू व ध्वनिप्रदूषणावर नियंत्रणासाठी महापालिकेचा निर्णय; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा
Construction
ConstructionPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वाढत्या वायू व ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांच्या कामकाजावर वेळेचे निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार शहरातील सर्व प्रकारची बांधकामे सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

Construction
Pune Rabies Vaccine Dog Bite: श्वान चावल्यानंतर २४ तासांत लस घ्या; पुण्यात मोफत रेबीज उपचार उपलब्ध

महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार, शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः पहाटे व उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, हवेचा गुणवत्ता निर्देशांकही खालावत असल्याची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांकडून येणाऱ्या वारंवार तक्रारींचा विचार करून प्रशासनाने बांधकामांच्या वेळा निश्चित केल्या आहेत.

Construction
Pune Hydroponic Ganja Smuggling: पुणे विमानतळ ‘हायड्रोपोनिक गांजा’ तस्करीचे हॉटस्पॉट बनले

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, नव्याने देण्यात येणाऱ्या बांधकाम परवानग्यांमध्ये या अटींचा समावेश अनिवार्य करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर हे परिपत्रक लागू करण्यात आले असून, शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news