Pune Construction Site Safety: दिवाळीत पुण्यातील बांधकामांवर महापालिकेचा सुरक्षा वॉच; नियम मोडणारी कामे तातडीने बंद होणार!

कामगारांच्या सुट्टीमुळे अपघाताचा धोका; सुरक्षा साधने, बॅरिकेडिंग आणि प्रकाशव्यवस्था बंधनकारक, कामांसाठी १६ अटी लागू
Construction
ConstructionPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या सुट्टीत कामगार मोठ्या प्रमाणावर गावी जात असताना शहरातील बांधकामे आणि विविध विकासकामांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक साधनसामग्री आणि सुरक्षाव्यवस्था उपलब्ध नसताना काम सुरू ठेवून अपघाताचा धोका पत्करू नये, असा कडक इशारा महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिला आहे. सुरक्षा नियमांची पूर्तता न करणारी कामे तातडीने बंद करण्याचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले.

Construction
Pune Development Plan: पुण्यातील नऊ गावांच्या विकास आराखड्यात १४३ बदल; उंड्रीतील महामार्गाची रुंदी ६० वरून ४५ मीटर

दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही बांधकामांसह विविध विकासकामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मनुष्यबळाअभावी उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून काम उरकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांसह रस्ते विकास आणि अन्य विकासकामे करताना अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी महापालिकेचा बांधकाम विभाग सरसावला असून, दिवाळीच्या काळात काम करण्यासाठी नियमावली तयार केली आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.

Construction
Shetphalgarhe Health Centre Medicine Theft: गरिबांच्या उपचारांसाठीची औषधे रातोरात गायब; शेटफळगढे आरोग्य केंद्रातील प्रकाराने खळबळ

दिवाळीच्या सुटीत सुरू असलेल्या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सुरक्षा उपाययोजनांची खातरजमा करावी लागणार आहे. त्यानंतर 'सेफ्टी कम्प्लायन्स चेकलिस्ट' सादर करणे बंधनकारक केले. बांधकामस्थळांवर मजबूत बॅरिकेडिंग करणे, नागरिक आणि वाहनांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, खोदलेले खड्डे व उत्खनन केलेल्या जागा सुरक्षित ठेवणे बंधनकारक केले आहे.

Construction
Shirur Municipal Council: शिरूर नगरपरिषदेत विरोधी पक्षच नाही! उपनगराध्यक्षपदी नितीन पाचर्णे बिनविरोध; सत्तेची दोन्ही प्रमुख पदे पाचर्णे कुटुंबाकडे

रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था, सूचनाफलक, रिफ्लेक्टर आणि ब्लिंकर बसविण्याचेही आदेश दिले आहेत. कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आणि अन्य वैयक्तिक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणेही आवश्यक केले आहे.

Construction
Consumer Commission Online Hearing: ग्राहक आयोगाच्या सुनावण्या आता ऑनलाइन; राज्यातील सर्व आयोगांना सुविधा बंधनकारक

अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी, ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित

महापालिकेतील संबंधित कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सुरू असलेल्या बांधकामांची दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष पाहणी करायची आहे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी जबाबदार पर्यवेक्षक आणि सुरक्षा प्रतिनिधी उपलब्ध असल्याची खात्री करावी लागणार आहे. आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि सुरक्षा साधने उपलब्ध नसल्यास संबंधित काम तातडीने बंद करून बांधकामस्थळ सुरक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीत कामाला परवानगी देताना १६ अटी घालतल्या असून, त्यांची पूर्तता करण्याचे बंधन महापालिकेतील अधिकाऱ्यांवर घातले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.