

Pune Chandani Chauk PMPL Bus Accident
पुणे : पुण्यातील चांदणी चौकाजवळ पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना मंगळवारी (29 एप्रिल) घडली असून भरधाव बसने पाच ते सहा दुचाकी, एक रिक्षा आणि आणखी काही गाड्यांना धडक दिल्याचे प्राथमिक वृत्त समोर येत आहे. या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चांदणी चौकाजवळ पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात घडला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. बसने किमान सहा दुचाकी, एक रिक्षा आणि अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातातील जखमींचा आकडा, अपघात नेमका का घडला, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
माध्यमांमधील वृत्तानुसार दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत.