Pune Viral Video: कारचालक महिलेनं 34 वर्षांच्या तरुणाला दोन किमी फरफटत नेलं

Pune Accident News: लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई ः संगमवाडी ते येरवडा रस्‍त्‍यावर शनिवारी घडली होती घटना
pune accident video screen grab
Pune Car Accident VideoPudhari
Published on
Updated on

पुणे : संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर किरकोळ अपघातानंतर कारचालक महिलेने एकाला फरफटत नेले. याबाबतचा व्हिडीओ व्‍हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारचालक महिलेला अटक केली. याप्रकरणी कारचालक महिला मेरसेदे रसुलीफर (वय ४५) हिला अटक करण्यात आली.

या घटनेत राम लक्ष्मण राठोड (वय ३४) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिली.

pune accident video screen grab
Pune municipal budget 2026-27: पुणे महापालिकेचे 2026-27 चे अंदाजपत्रक 30 जानेवारीपर्यंत; रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठ्यावर भर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक महिला शनिवारी (दि.१७ जानेवारी) येरवड्यातील सादलबाब दर्गा रस्त्याने संगमवाडीकडे निघाली होती. त्या वेळी तेथून निघालेल्या कारचालक राम राठोड याच्याबरोबर किरकोळ अपघातानंतर वाद झाला.

राठोड याने कार थांबवून कारचालक महिला मेरसेदे हिला कारमधून बाहेर येण्यास सांगितले. मात्र, तिने कार सुरूच ठेवली. कारच्या समोर राठोड थांबले. कार सुरू ठेवल्याने राठोड यांनी मोटार अडविण्याचा प्रयत्न केला.

pune accident video screen grab
Pune Dog Abuse Video: श्वानाशी गैरवर्तनाचा व्हिडीओ व्हायरल, संबंधित संस्थेला नोटीस

कारचालक महिलेने कार तशीच पुढे नेली. प्रसंगावधान राखून राठोड यांनी बोनेट धरून ठेवले. मेरसेदे हिने कार दोन किलोमीटर पुढे नेली. या घटनेची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news