Pune Cantonment Gates: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये पुन्हा गेट उभारणी; नागरिकांच्या वाहतुकीवर निर्बंधाची भीती

बूम बॅरियर असतानाही नव्या गेटचे काम सुरू; सार्वजनिक रस्ते बंद करू नका, असोसिएशनची मागणी
Pune Cantonment Gate
Pune Cantonment GatePudhari
Published on
Updated on

मुंढवा: असोसिएशनने यापूर्वी २९ जानेवारी, ८ फेब्रुवारी, १७ एप्रिल आणि २० एप्रिल २०२६ रोजी निवेदने देऊन कॅन्टोन्मेंट हद्दीतील सार्वजनिक रस्त्यांवर गेट्स उभारण्यास आक्षेप घेतला होता. तसेच, पुणे सबएरिया कमांडर यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती.

Pune Cantonment Gate
Yerawada Dengue Cases: येरवड्यात डेंग्यूचा डंख! दोन महिन्यांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

मात्र, त्यानंतरही काहून रोड आणि परेड ग्राऊंड रोड चौकात आधीच बूम बॅरियर असलेल्या ठिकाणी आणखी एका गेटचे बांधकाम सुरू केले आहे. या गेटची आवश्यकता काय? असा प्रश्न असोसिएशनने उपस्थित केला आहे.

Pune Cantonment Gate
Pune Theatres Canteen: पुण्यातील नाट्यगृहांत रंगणार ‘कॅन्टीन’चा प्रयोग; चार ठिकाणी महिनाभरात सुविधा सुरू

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांचा दररोज हजारो नागरिक वापर करतात. त्यामुळे सार्वजनिक रस्ते बंद करणे किंवा प्रवेशावर निर्बंध आणताना संरक्षण मंत्रालय, डायरेक्टोरेट जनरल डिफेन्स इस्टेट्स आणि इतर सक्षम प्राधिकरणांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे.

Pune Cantonment Gate
Pune SIR Voter Verification: पुण्यात एसआयआरची डोकेदुखी वाढली; २१.२७ लाख मतदार स्थलांतरित, मृत किंवा अनुपस्थित

गेट्सचे बांधकाम तातडीने थांबवावे, सार्वजनिक निधीचा अनावश्यक खर्च टाळावा आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत लष्कर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Pune Cantonment Gate
Pune Special NDPS Court: पुण्यात स्वतंत्र एनडीपीएस न्यायालय; १,४२५ प्रलंबित खटल्यांना मिळणार वेग

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर उभारण्यात येणारी गेट्स उघडी ठेवण्यात येतील, नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे आश्वासन लष्कर अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिले होते. त्यानंतर काही काळ गेट उभारणीचे काम थांबले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटमधून ये-जा नागरिकांच्या वाहतुकीवर निर्बंध येण्याची भीती निर्माण झाली आहे.

हुजेफा लोखंडवाला, रहिवासी, पुणे कॅन्टोन्मेंट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news