Pune Builder Extortion Threat: पुण्यात बांधकाम व्यावसायिकाला ५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी; ‘टायसन बिष्णोई’च्या नावाने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

एअरपोर्ट रोड परिसरातील प्रकार; व्यावसायिक, मुलगा, भाऊ आणि नातेवाईकांना धमकावले, विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Extortion News
Extortion NewsPudhari
Published on
Updated on

पुणे: एअरपोर्ट रोड परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला कुटुंबीय तसेच जवळच्या व्यक्तींना ठार मारण्याची धमकी देत टायसन बिष्णोईच्या नावे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ते १४ ऑगस्टदरम्यानच्या कालावधीत व्यावसायिकाचे घर, ऑफिस, मुलगा आणि त्यांचा भाऊ यांच्याबरोबरच त्यांच्या स्वतःच्या फोनवर घडला आहे.

Extortion News
Pune Encroachment Department Corruption: पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात ‘हप्ताराज’? पथारीवाल्यांकडून परवाना, जागा ते जप्त माल सोडवण्यापर्यंत वसुलीचे आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी व्यावसायिकांच्या मोबाईलवर फोन केले. मात्र, सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सतत फोन येत असल्यामुळे त्यांनी तो फोन उचलला. त्या वेळी समोरील व्यक्तीने तो टायसन बिष्णोई राजस्थान येथून बोलत असून, त्याला पाच कोटींची खंडणी हवी असल्याचे सांगितले.

Extortion News
Maharashtra School Closure: ‘२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका’; शिक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

१२ ते १४ ऑगस्टदरम्यान त्याने फिर्यादींना फोन करून त्यांचे नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती, त्यांच्या व्यवसायाची नावे घेऊन धमकावले. खंडणी दिली नाही तर कुटुंबातील व्यक्तींना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच, पाचच्या जागी पंधरा किंवा वीस करोड खंडणी द्यावी लागेल, असे म्हटले. फिर्यादींना त्यांच्या व्यावसायिक पार्टरनची नावे सांगितली. त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्यांची सर्व रेकी करण्यात आल्याचे आरोपीने सांगितले.

Extortion News
PMPML Electric Buses: पीएमपीचा ताफा २ हजारांपार; ११५ नव्या ई-बसने प्रवाशांना मोठा दिलासा

मेसेजद्वारे देखील आरोपीने फिर्यादींना खंडणीसाठी धमकाविले आहे. दरम्यान, सतत खंडणीसाठी येणाऱ्या धमकीच्या फोनमुळे फिर्यादींनी अखेर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार विमानतळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Extortion News
Naugpanchami Snake Rescue: गारुड्यांची पेटारी गेली; सर्पमित्रांची रेस्क्यू बॅग आली! नागपंचमीच्या परंपरेत मोठा बदल

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाच्या गोडाऊनवर आरजू बिष्णोई टोळीने गोळीबार करीत खंडणीची मागणी केली होती. त्यातील काही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यानंतर देखील आता परत टायसन बिष्णोईच्या नावाने व्यावसायिकाला पाच कोटींच्या खंडणीसाठी धमकाविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news