PMPML Electric Buses: पीएमपीचा ताफा २ हजारांपार; ११५ नव्या ई-बसने प्रवाशांना मोठा दिलासा

८३ इलेक्ट्रिक बस सेवेत दाखल; आणखी ३२ बस महिनाअखेरपर्यंत धावणार, ताफा २,०७१ वर पोहोचणार
PMPML Electric Bus
PMPML Electric BusPudhari
Published on
Updated on

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात नुकत्याच ८३ नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून, उर्वरित ३२ बस चालू महिन्याअखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात असलेली जवळपास १९०० च्या घरातील एकूण बसगाड्यांची संख्या आता थेट २ हजारांपेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

PMPML Electric Bus
Naugpanchami Snake Rescue: गारुड्यांची पेटारी गेली; सर्पमित्रांची रेस्क्यू बॅग आली! नागपंचमीच्या परंपरेत मोठा बदल

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पीएमपीने आपल्या ताफ्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर देत पीएमपीच्या ताफ्यात खेरेदीतील उर्वरित ११५ नवीन इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने समाविष्ट होत आहेत.

PMPML Electric Bus
Agriculture Department New Structure: कृषी विभागाच्या नव्या आकृतिबंधावर अधिकाऱ्यांचा आक्षेप; ‘शेतकरी केंद्रित रचना कमकुवत होणार’

यामुळे शहरातील बसफेऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. पूर्वी पीएमपीकडे १९०० च्या आसपास बस उपलब्ध होत्या, त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना ताटकळत राहावे लागत होते. मात्र, नवीन ११५ ई-बसच्या आगमनामुळे पीएमपीच्या ताफ्याची संख्या आता २ हजार ७१ वर पोहचणार आहे.

PMPML Electric Bus
DJ Lavani Eligibility Certificate: अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम; कार्यक्रमांपूर्वी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक

पीएमपीचा ताफा आता वाढला आहे. नुकत्याच ८३ इलेक्ट्रिक बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, आणखी ३२ बस या महिनाअखेरपर्यंत ताफ्यात दाखल होतील. म्हणजेच शिल्लक ११५ इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सेवेत येतील. पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात 1900 च्या घरात बस होत्या, त्या आता वाढून २,०७१ च्या घरात गेल्या आहेत. ताफा वाढल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.

महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news