Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम

वसुंधरा संरक्षणासाठी २७ हजारांहून अधिक नागरिकांची शपथ; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Pune Book Festival
Pune Book FestivalPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी तिसरा विश्वविक्रम करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या पंचप्रणाला अनुसरून हा विश्वविक्रम करण्यात आला आहे. या विश्वविक्रमासाठी सहभाग घेतलेल्या हजारो नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेतली.

Pune Book Festival
Fursungi Election Result: फुरसुंगी नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा

यात युवा पिढीचा सहभाग आश्वासक होता. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी समारोपात दिली. दरम्यान, नागरिकांनी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारोंच्या संख्येने महोत्सवाला भेट देत पुस्तकांची खरेदी केली असल्याचे पहायला मिळाले.

Pune Book Festival
Pune Hockey Tournament: इन्कम टॅक्स पुणे संघाचा डॉ. आंबेडकर हॉकी चषकावर कब्जा

राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर गेले नऊ दिवस जल्लोषात सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ राजेंद्र शेंडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद काटीकर, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अभिनेते प्रवीण तरडे आदी उपस्थित होते.

Pune Book Festival
Wanwadi Chain Snatcher Arrest: ज्येष्ठाला गाठून सोनसाखळी लुटणारा दुचाकीस्वार अटकेत

यंदाच्या महोत्सवात एकूण तीन विश्वविक्रम करण्यात आले. यंदाच्या महोत्सवात शांतता... पुणेकर वाचत आहेत; तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ''लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स'' हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. या साखळीतील तिसरा विश्वविक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्रणाला अनुसरून करण्यात आला आहे. ''लार्जेस्ट ऑनलाइन व्हिडीओ अल्बम ऑफ पीपल रीसायटिंग ओथ/प्लेज'' असे या विश्वविक्रमाचे नाव आहे.

Pune Book Festival
MAHA TET Answer Key: टिईटी परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर

या विश्वविक्रमासाठी २७ हजार १४० नागरिकांनी वसुंधरा संरक्षणासाठी शपथ घेऊन, व्हिडीओ रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडीओ ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ ४ दिवसांत करण्यात आली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमानुसार २१ हजार ४९८ नागरिकांचे व्हिडीओ ग्राह्य धरून नवा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वीचा विश्वविक्रम हा ११ हजार २५१ ''ऑनलाईन व्हिडीओ अल्बम''चा होता. हा विश्वविक्रम होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आयटी विभागाने प्रयत्न केल्याची माहिती पांडे यांनी दिली.

Pune Book Festival
Marathi Dialect: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्यापीठात ‘बोलींचा जागर’ उपक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, लाखो नागरिकांनी महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृतीला वाढविण्याचे काम केले आहे. या महोत्सवात नागरिकांनी भरभरून पुस्तकांची खरेदी केली आहे. अनेक पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. या सर्वांची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. महोत्सवातील सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांना झालेली गर्दी अविस्मरणीय होती. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांच्या हक्काचा महोत्सव झाला आहे. या महोत्सवाला पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.

राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news