Pune Hockey Tournament: इन्कम टॅक्स पुणे संघाचा डॉ. आंबेडकर हॉकी चषकावर कब्जा

अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनीचा ४–२ असा पराभव; बाबू मेटकरचे दोन गोल निर्णायक
डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेतील विजेता इन्‍कम टॅक्‍सचा संघ करंडकासह.
डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेतील विजेता इन्‍कम टॅक्‍सचा संघ करंडकासह.Pudhari
Published on
Updated on

पुणे : डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेच्या अंतिम फेरीत स्थानिक क्रीडा प्रबोधिनी संघाचा ४-२ असा पराभव करीत इन्कम टॅक्स पुणे संघाने विजेतेपद पटकाविले.

डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेतील विजेता इन्‍कम टॅक्‍सचा संघ करंडकासह.
Wanwadi Chain Snatcher Arrest: ज्येष्ठाला गाठून सोनसाखळी लुटणारा दुचाकीस्वार अटकेत

अंतिम फेरीत राज पवारने (८ व्या मिनिटाला) मैदानी गोल केल्याने आयकर पुणे संघाने सुरुवातीच्या काही मिनिटांतच आघाडी घेतली. त्यानंतर बाबू मेटकरने (१५ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर गोल करून मध्यंतराला आघाडी २-० अशी वाढवली. उत्तरार्धाच्या सुरुवातीला इन्कम टॅक्स संघाच्या राहुल शिंदेने (३४ मिनिटांनी) मैदानी गोलसह त्यात भर घातली. ०-३ असे पिछाडीवर असताना कार्तिक पठारे (४३ मिनिटांनी, ४९ मिनिटांनी) पेनल्टी कॉर्नरवर गोल करून क्रीडा प्रबोधिनीने प्रतिस्पर्धी संघाची आघाडी ३-२ अशी कमी केली. बाबू मेटाकरने (५२ मिनिटांनी) वैयक्तिक दुसरा गोल करून इन्कम टॅक्स संघाला ४-२ अशा फरकाने जिंकून दिले.

डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेतील विजेता इन्‍कम टॅक्‍सचा संघ करंडकासह.
MAHA TET Answer Key: टिईटी परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर

तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात रिपब्लिकन एस. सी.ने मध्यंतरापर्यंत २-० अशी आघाडी घेत पुणे शहर पोलिसांवर ४-१ अशी मात केली. कृष्णा मुसळेने (७ व्या मिनिटाला) फिल्ड-गोल करीत पुणे शहर पोलिस संघाचे खाते उघडले. रिपब्लिकन एस. सी.ने २१ मिनिटांनी बरोबरी साधली. त्यात सौरभ मैकरचा (२८ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर गोल महत्त्वा‍चा ठरला.

डॉ. आंबेडकर हॉकी स्‍पर्धेतील विजेता इन्‍कम टॅक्‍सचा संघ करंडकासह.
Marathi Dialect: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विद्यापीठात ‘बोलींचा जागर’ उपक्रम

त्यानंतर देवव्रत हिरेने (२९ व्या मिनिटाला) गोल करून रिपब्लिकन एस. सी.ला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यांनी पहिल्या हाफमध्ये २-१ अशी आघाडी राखली. उत्तरार्धात रिपब्लिकन एस. सी.ने दोनदा गोल करीत मोठी आघाडी घेतली. रायथेम मामनिया (५३ व्या मिनिटाला) आणि श्रीकृष्ण चौरसियाने (५६ व्या मिनिटाला) अनुक्रमे मैदानी आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल केला तसेच रिपब्लिकन एस. सी. संघाला ४-१ असे जिंकून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news