Pune BJP Operation Lotus: ऑपरेशन लोटसचा पुण्यात धडाका; भाजप मजबूत, निष्ठावंतांत अस्वस्थता

पक्षप्रवेशांनी महायुतीला बळ, पण आयात उमेदवारांमुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऑपरेशन लोटसमुळे राष्ट्रवादी कॉंग््रेास (अजित पवार गट), राष्ट्रवादी कॉंग््रेास (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढत असतानाच पक्षांतर्गत नाराजीही तितक्याच वेगाने वाढताना दिसत आहे. इतर पक्षांतून आलेल्या इच्छुकांना थेट उमेदवारी किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाजपमधील जुने, निष्ठावान इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना ‌‘आयात‌’ नेत्यांमुळे तिकीट मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे.

BJP
Pune Political Analysis: पुण्यात शिवसेनेचा ‘अग्निपथ’; अस्तित्वासाठी निर्णायक लढाई

पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने महायुतील घटकपक्षांसह महाविकास आघाडीला ‌‘जोर का झटका‌’ दिला आहे. शनिवारी मुंबईत विविध पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजप व महायुतीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग््रेासचे (शरदचंद्र पवार गट) आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील विकास दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे तर काँग््रेास नेते व दिवंगत माजी मंत्री वसंतराव चव्हाण यांचे पुत्र कणव चव्हाण, हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग््रेासच्या वैशाली तुपे, विराज तुपे, खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे, शुभांगी होले (शिवरकर), राजेंद्र लोखंडे, बाबा शिवरकर, विद्यानंद बोंद्रे, इंदिरा तुपे तर मुळशी तालुक्यातील उबाठा गटाचे कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सभापती भानुदास पानसरे, उपतालुकाप्रमुख गणेश पानसरे, कृष्णकुमार पानसरे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष आनंद माझिरे, उपाध्यक्ष संतोष पानसरे, सरचिटणीस सुहास पानसरे, उपाध्यक्ष किरण मराठे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांच्या प्रवेशामुळे पुण्यातील पर्वती, सिंहगड रोड, खडकवासला, धायरी आणि वडगाव शेरी परिसरात महायुतीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. तर विधानसभेत काँग््रेासमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवलेले आबा बागूल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे ज्या भागात भाजप कमकुवत होती, त्या ठिकाणी आता त्यांची ताकद वाढली आहे.

विकासाचे धनुष्यबाण उचलले आहे. पुणेकरांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. विकास होत नव्हता. सत्ता होती किंवा नव्हती, याला महत्त्व नाही. पण, विकास होणे आवश्यक आहे. पुण्याचा आणि प्रभागाचा विकास करायचा आहे. पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभारी आहे.

आबा बागूल, शिवसेना शिंदे गट

BJP
Pune Police |पुणे पोलिस ॲक्शन मोडवरः वाहन तोडफोड करणाऱ्यांना दिले पिस्तुलाने प्रतिउत्तर

भाजपला महापालिका निवडणुकीत 125 उमेदवार निवडून आणायचे आहेत. या लढतीत राष्ट्रवादी कॉंग््रेास अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर ठेवत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जिंकलेल्या प्रभागावर यंदा भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे हे पक्षप्रवेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे. वारजेमध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत चारही राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते. हा प्रभाग भाजपला प्लसमध्ये आणण्यासाठी सायली वांजळे, दिलीप बराटे, बाबा धुमाळ आणि सचिन दोडके यांचा भाजप पक्षप्रवेश करण्यात आल्याने राष्ट्रवादीची क्षमता क्षीण झाली असून, हा प्रभाग आता भाजपमय झाला आहे. या प्रभागातून भाजपचे वासुदेव भोसले व त्यांच्या पत्नी रोहिणी भोसले ह्या इच्छुक होत्या तसेच किरण बारटक्के व सचिन दांगट हे 8 वर्षांपासून प्रभागात भाजपचे काम करीत होते. त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आयात उमेदवारांना या ठिकाणी प्रवेश दिल्याने या भाजप निष्ठावंतांचा पत्ता आता कट होणार आहे. धनकवडी, कात्रज डेअरी, बालाजीनगर, आंबेगाव कात्रज या भागातून बाळा धनकवडे यांना पक्षप्रवेश देऊन येथेही राष्ट्रवादीला भाजपने शह दिला आहे. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत तीन उमेदवार राष्ट्रवादीचे व वर्षा तापकीर या भाजपच्या एकमेव नगरसेविका निवडून आल्या होत्या. मात्र, आता बाळा धनकवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे विशाल तांबे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून मी वडगाव शेरीत काम करीत आहे. सुरेंद्र स्वत:चा निर्णय घेण्यास सक्षम आहेत. मुलगा सुरेंद्र पक्षातून भाजपमध्ये गेल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होईल, हा दावा चुकीचा आहे. त्यांची भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे आमच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.

बापूसाहेब पठारे, आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ

BJP
Maharashtra cold wave| राज्याला हुडहूडी भरली : जळगाव, अहिल्यानगर,नाशिकचा पारा ६ अंशावर

आमदार बापू पठारे यांचा बालेकिल्ला असलेल्या खराडी-वाघोलीत 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची लाट असताना या प्रभागात चारही उमेदवारांना पठारे आमदार नसताना विजयी झाले होते. सध्या ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. मात्र, त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रभागात भाजपची ताकद वाढली आहे. सुरेंद्रसोबत भाजपमध्ये त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक महेंद्र पठारे, संतोष भरणे आणि माजी नगरसेविका सुमन पठारे यांचाही प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागात देखील भाजपचे अनेक इच्छुक नाराज झाले आहे. संतोष भरणे यांचा भाजप पक्षप्रवेश झाल्यास भाजपमधून उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार असलेले अनिल नवले, संदीप सातव यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

पक्षावर प्रेम करणारी जनता असते. पक्ष सोडून कोणी व्यक्ती गेल्यामुळे पक्षाचे कधीच नुकसान होत नाही. व्यक्ती गेली तरी पक्ष कायम तिथेच असतो. त्यामुळे नारायण गलांडे पक्षातून भाजपमध्ये गेल्यामुळे फरक पडणार नाही.

सुनील टिंगरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग््रेास पक्ष, (अजित पवार गट)

BJP
S Jaishankar|अमेरिका,चीन,रशियापेक्षा व्यापारासाठी युरोप चांगला!

एकमेकांचे उमेदवार न घेण्याच्या वाद्याला मूठमाती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात विकास कामांच्या उद्घाटनाला आले तेव्हा एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाही, असे ठरले असल्याचे सांगितले. मात्र, आज 22 जणांचा पक्षप्रवेश झाला. यातील बहुतांश जण हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे होते. त्यामुळे एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाही, या वाद्याला मूठमाती मिळाली. आबा बागूल यांनी कॉंग््रेासला हात दाखवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ते देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना शिवसेना शिंदे गटातून प्रवेश देऊन महायुतीतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील भाजपचे महेश वाबळे, सी. थोपटे, गणेश घोष हे इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पुण्यातील माजी नगरसेवकांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी सर्वांचे भाजपात स्वागत करीत पार्टीत योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द प्रवेश करणाऱ्या सर्वांना दिला आहे.

मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news