Pune Police |पुणे पोलिस ॲक्शन मोडवरः वाहन तोडफोड करणाऱ्यांना दिले पिस्तुलाने प्रतिउत्तर

आव्‍हाळवाडी फाट्यावर पोलिस–गुंड थरार; पोलिसांच्या प्रत्युत्तरात आरोपीच्या पायाला लागली गोळी
Pune Police
Pune Police | पोलिस ॲक्शन मोडवरः वाहन तोडफोड करणाऱ्यांना दिले पिस्तुलाने प्रतिउत्तर
Published on
Updated on

पुणे : शहरात वाहने तोडफोफ करून दहशत माजवाल तर खबरदार, कारण अशा सराईतांचा बंदोबस्त पोलिस आता थेट पिस्तूलाने करणार आहेत. त्याची सुरुवात चंदनगर पोलिसांनी केली आहे. पुण्यातील आव्‍हाळवाडी फाटा परिसरात शनिवारी सायंकाळी पोलिस आणि गुंडामध्ये थरारक चकमक उडाली. पोलिस शोध घेतलेला वाहन तोडफोडील आरोपीने पोलिसांच्‍या पथकावर थेट गोळीबार केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर दिले. या कारवाईत त्‍याच्‍या डाव्या पायाच्या मांडीला गोळी लागून तो जखमी झाला आहे.

चंदननगर पोलीस ठाण्यात ओमकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर, पूर्ण पत्ता अज्ञात) याच्‍यावर आर्म ॲक्‍ट व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच तोडफोड प्रकरणातही त्‍याचा शोध पोलिस घेत होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे आणि त्यांचे पथक आरोपीच्या शोधासाठी आवळवाडी–चंदननगर रस्त्या परिसरात मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे गेले होते. यावेळी पोलिसांची चाहुल लागताच भंडारे हा झाडाझुडपात लपून बसला होता.

Pune Police
New Police Station Pune: पुणे शहरात पाच नवीन पोलिस ठाणी, दोन परिमंडळांना मंजुरी; शासननिर्णयावर शिक्कामोर्तब

त्‍याला पोलिस ताब्यात घेण्याचा प्रयत्‍न करत असतानाच त्‍याने त्‍याच्‍याजवळील गावठी पिस्‍तुलातून पोलिसांवरच गोळी झाडली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रसंग अत्यंत गंभीर बनला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक ढावरे यांनी संरक्षणार्थ त्यांच्याकडील पिस्‍तुलातून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात आरोपी भंडारेच्या डाव्या पायाच्या मांडीला गोळी लागली आणि तो जागीच कोसळला. घटनेनंतर जखमी आरोपीला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या फायरिंगमध्ये कोणताही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जखमी झालेला नाही. या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली.

Pune Police
Pune Crime: खाऊच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार; तरुणास २० वर्षे सक्तमजुरी

परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, आरोपीने गावठी कट्टा कुठून आणला, यामागे आणखी कोण सहभागी आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिस उपायुक्‍त सोमय मुंडे यांच्‍या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून शहरात वाहन तोडफोड आणि रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचे सत्र सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्ता नितेश कुमार यांनी अशा सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत.

शहरात वाहनांची तोड- फोड करून कोणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल. तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत असेल तर पोलीस त्याचा कठोर कारवाई करून बंदोबस्त करतील. पोलिसावर कोणी हल्ला करत असेल तर पोलीस देखील त्याला पिस्तुलाने उत्तर देतील.

सोमय मुंडे , पोलिस उपायुक्त पुणे शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news