

पुणे: पुणे महापालिकेतील आमचा गटनेता येत्या दोन दिवसांत निश्चित होईल. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक जाहीर झाल्यावर महापौर, उपमहापौर आणि इतर पदे कोणाला द्यायचे, याचा निर्णय वरिष्ठपातळीवर होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, अशा विविध पदांवर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली.
या बैठकीला व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूकप्रमुख गणेश बिडकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, श्रीनाथ भिमाले हे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेच्या माध्यमातून कोणत्या पदासाठी कोण इच्छुक आहे, याचा अंदाज घेण्यात आला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले की, महापालिकेतील विविध पदांसाठी जे इच्छुक आहेत, त्यांची नावे शहरातील कोअर कमिटी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला कोणते पद द्यायचे, याबाबतचे पत्र शहराध्यक्षांना त्यानुसार पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख विचारात घेता, येत्या दोन दिवसांत नाव जाहीर होईल.
उपमहापौरपदाची आठवले गटाने मागणी केल्याच्या प्रश्नावर मोहोळ म्हणाले की, आम्ही युतीमध्ये लढलो आहोत, अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, याबाबतचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एकत्रित बसून निर्णय असे त्यांनी सांगितले.