

पुणे: पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत गुरुवार, 29 जानेवारी रोजी शहरातील विविध केंद्रे, पाण्याच्या टाक्या व केंद्रांमध्ये तातडीची विद्युत आणि यंत्रणांची दुरुस्ती व देखभाल कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागांत संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या दुरुस्ती कामांत पर्वती येथील नवीन व जुने केंद्र, त्याअंतर्गत येणाऱ्या पर्वती व टाक्या, पर्वती पॉइंट, वडगाव केंद्र, राजीव गांधी स्टेशन, लष्कर, वारजे तसेच वडगाव संबंधित विविध टाक्या व व्यवस्थेचा समावेश आहे. या कालावधीत व यंत्रणा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवाव्या लागणार असल्याने पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
या भागात राहणार पाणीपुरवठा बंद
पर्वती टाकी परिसर : गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, कात्रज गेट, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवारी पेठ, अर्जुन स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन तसेच मुंढवा काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पर्वती टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, काही भाग, व अपर इंदिरानगर, शिवदर्शन, बिबवेवाडी गावठाण, शेलार मळा, टिळक वसाहत, पर्वती गावठाण, कुमार तसेच कोंढवा काही भाग या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
पर्वती टाकी परिसर : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, परिसर, शिवाजीनगर आणि स्वारगेट परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
वडगाव परिसर : आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, आंबेगाव खुर्द व बुद्रुक, येवलेवाडी, काही भाग, दाते वसाहत आदी भागांवर या परिणाम होणार आहे.
राजीव गांधी स्टेशन परिसर : संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, बाणेर सिटी, टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, टाकी, राजस सोसायटी, सोसायटी, सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, धनकवडी, जुना प्रभात व विभाग तसेच येवलेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
लष्कर ते खराडी : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, परिसर, यशवंतनगर, चंदननगर, सोसायटी, गणेशनगर, राजश्री कॉलनी, महादेवनगर, माळवाडी, मनोहर सोसायटी यांसह अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही.
लष्कर वारजे टाकी, शिवणे इंडस्ट्रीज, चतु:शृंगी टाकी, होळकर खडकवासला जॅकवेल तसेच अंतर्गत येणाऱ्या या परिणाम जाणवणार आहे.