Pune Hoarding QR Code Rule: पुण्यात जाहिरात फलकांवर QR कोड अनिवार्य; पारदर्शकतेसाठी नवा नियम

27 मेपासून अंमलबजावणी सुरू; अनधिकृत होर्डिंग्सवर कडक कारवाईचा इशारा
Hoarding QR Code
Hoarding QR CodePudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील अधिकृत जाहिरात फलकांवर क्यूआर कोड लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने हा निर्णय घेतला असून, 27 मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या 9 मे 2022 च्या जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

Hoarding QR Code
Pune Illegal RMC Plant Controversy: पुण्यात आरएमसी प्रकल्पांवर कारवाई थांबली? नागरिकांचा संताप

या निर्णयामुळे जाहिरात फलकांबाबत अधिक पारदर्शकता येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांना संबंधित फलकाची परवानगी, नूतनीकरण, मालकी हक्क, तसेच परवान्याची वैधता यासंबंधीची माहिती क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईलवर सहज पाहता येणार आहे.

Hoarding QR Code
Pune Solid Waste Management Controversy: पुणे महापालिकेत घनकचरा विभागात मोठी फेररचना

महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत हे क्यूआर कोड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येक जाहिरात फलकाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात ते स्पष्टपणे लावणे बंधनकारक असेल. ज्या फलकांवर क्यूआर कोड नसतील, किंवा स्कॅन केल्यानंतर आवश्यक माहिती उपलब्ध होणार नाही, तसेच माहितीफलक नसलेल्या जाहिरातींना अनधिकृत समजून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Hoarding QR Code
Baramati Bypoll EVM Security: बारामती पोटनिवडणुकीनंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित

क्यूआर कोडमधील माहितीमध्ये बदल करण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार असून, त्यावर माहिती व तंत्रज्ञान विभागाचे नियंत्रण असेल. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांतील सहायक आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आले असून, कोणतीही कसूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

Hoarding QR Code
Purandar NH 965 Toll Protest: जेजुरीतील NH-965 टोलला विरोध; वारकरी व स्थानिक नागरिक संतप्त

या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी आदेश जारी केले असून, शहरातील अनधिकृत जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे अधिकृत होर्डिंग्सची स्पष्ट ओळखही नागरिकांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news