Pune Bhide Bridge Closed: पुण्यात भिडे पूल 5 सप्टेंबरपर्यंत बंद; डेक्कन मेट्रो पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात

वनाझ–रामवाडी मेट्रो मार्गिकेवरील जोडणीसाठी बांधकाम; नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था
Bhide Bridge Metro Work
Bhide Bridge Metro WorkPudhari
Published on
Updated on

पुणे: वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेवरील डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने मंगळवारी दि. ९ जूनच्या रात्री १२ वाजेपासून ते ५ सप्टेंबरपर्यंत मुठा नदीवरील भिडे पूल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

Bhide Bridge Metro Work
Pune Tunnel Project: पुण्यात 56 किमीचा ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग प्रकल्प सुरू; डिसेंबरपासून कामाची शक्यता

पुणे मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून या कामासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. दरम्यान, भिडे पूल बंद असला, तरी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असेल.

Bhide Bridge Metro Work
Kedgaon Illegal Abortion Case: केडगाव गर्भलिंग निदान-गर्भपात प्रकरण; खासगी डॉक्टरभोवती संशयाचे वलय

वनाझ ते रामवाडी मार्गावरील छत्रपती संभाजी उद्यान व डेक्कन जिमखाना या स्थानकांना पुण्याच्या मध्यवर्ती पेठ भागाशी जोडण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. यातील छत्रपती संभाजी उद्यान स्थानकाचा पूल आधीच नागरिकांसाठी खुला झाला आहे.

Bhide Bridge Metro Work
Maharashtra E-NAM Agriculture Market Committees: ई-नाम योजनेत मोठा विस्तार: महाराष्ट्रातील 30 नवीन बाजार समित्यांचा समावेश

आता डेक्कन स्थानकाचा पूल थेट भिडे पुलावरून बांधण्यात येत आहे. हा पूल पूर्ण झाल्यावर नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे अतिशय सोपे होणार आहे.

Bhide Bridge Metro Work
Purandar International Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती: 60% भूसंपादन पूर्ण, शेतकऱ्यांची मोठी संमती

वाहतुकीसाठी हे आहेत पर्यायी मार्ग...

भिडे पूल बंद असलेल्या काळात नागरिकांनी खालील पुलांचा वापर करून प्रवास करावा...

  • लकडी पूल (संभाजी पूल)

  • बालगंधर्व पूल

  • झेड ब्रिज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news