Pune Tunnel Project: पुण्यात 56 किमीचा ‘पाताळलोक’ भुयारी मार्ग प्रकल्प सुरू; डिसेंबरपासून कामाची शक्यता

75 ते 77 हजार कोटींचा मेगा प्रकल्प; रिंगरोड आणि HCMTRसह तीन मोठ्या प्रकल्पांवर वेग
Underground Tunnel
Underground TunnelPudhari
Published on
Updated on

पुणे: शहराच्या वाहतूक सुधारणांसाठी महत्त्व‍ाकांक्षी ठरणाऱ्या ५६ किमीच्या भुयारी मार्गाच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून, येत्या नोव्हेंबरपर्यंत तो पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

Underground Tunnel
Kedgaon Illegal Abortion Case: केडगाव गर्भलिंग निदान-गर्भपात प्रकरण; खासगी डॉक्टरभोवती संशयाचे वलय

पुण्यातील महत्त्व‍ाकांक्षी प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गत आठवड्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले की, पाताळ लोक, अंतर्गत रिंगरोड आणि उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) या तीनही प्रकल्पांवर बैठकीत चर्चा झाली. या तीनही प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त या कंपनीचे अध्यक्ष असणार असून, त्यात अन्य विभागांचे सदस्य असतील.

Underground Tunnel
Maharashtra E-NAM Agriculture Market Committees: ई-नाम योजनेत मोठा विस्तार: महाराष्ट्रातील 30 नवीन बाजार समित्यांचा समावेश

वेळ वाचविण्यासाठी दोन अहवाल एकत्रच!

पाताळलोक प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) स्वतंत्र न करता एकत्रितच तयार केले जाणार आहेत. हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अंदाजे ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जूनपासून या अहवालाचे काम सुरू झाले असून, नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली.

Underground Tunnel
Purandar International Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळ प्रकल्पाला गती: 60% भूसंपादन पूर्ण, शेतकऱ्यांची मोठी संमती

प्रकल्पांचा खर्च ७५ ते ७७ हजार कोटी

या तीनही प्रकल्पांसाठी अंदाजित ७५ ते ७७ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. त्यात भुयारी बोगद्यासाठी ४० हजार कोटी, वर्तुळाकार रस्त्यासाठी (रिंग रोड), २७ हजार कोटी आणि एचसीएमटीआरसाठी १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एवढा निधी उभारणे महापालिकेला शक्य नसल्याने हे प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ आणि ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर राबविला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २० टक्के 'निधी' मिळणार असून, राज्य सरकारचा २० टक्के हिस्सा असेल. उर्वरित निधी कर्ज आणि भागभांडवलाच्या माध्यमातून उभारला जाईल, असे आयुक्त राम यांनी सांगितले.

Underground Tunnel
Maharashtra ITI Admission 2026: आयटीआय प्रवेश 2026: राज्यात 1.12 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रिया वेगात

दुहेरी बोगदा की दुमजली मार्ग? पडताळणीसाठी कंपनीची नियुक्ती

‘पाताळलोक’ या प्रकल्पांतर्गत ५६ किमीचा भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. मात्र, हा भुयारी मार्ग दुमजली करायचा की दुहेरी भुयारी मार्ग, यावर पडताळणी सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता दुहेरी भुयारी मार्गाचा पर्याय अधिक सुरक्षित आणि सोयीचा मानला जातो. या दोन्ही पर्यायांची सुरक्षा पडताळणी करण्यासाठी एका नामांकित कंपनीची नियुक्ती केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान, भुयारी मार्गात येरवडा, शास्त्रीनगर ते कोंढवा खडीमशिन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान ते औंधमार्गे जगताप डेअरी, खडकी ते शास्त्रीनगर चौक तसेच पु. ल. देशपांडे उद्यान ते सेव्हन लव्हज् चौक आणि बाणेर-पाषाण मार्गाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news